सांगेन गोष्टी युक्तीच्या दोन...

झालं असं, 
माझं क्ष नावाच्या राष्ट्रीयकृत बँकेच्या मुंबईतल्या शाखेतलं करंट खातं आहे... १७ ऑगस्टला पुण्यातल्या य नावाच्या बँकेच्या एटीएममधून मी सात हजार रुपये काढायला गेलो... प्रोसेस केली पण कळालं की एटीएम टेक्नीकली मेलेलं  होतं... त्यामूळे पैसे निघाले नाहीत, पण बाहेर आल्यावर सात हजार बँकेतून वजा झाल्याचा मेसेज आला.
प्रथेप्रमाणे तासाभरात कस्टमर केअरला फोन करुन तक्रार दिली... प्रकरण मार्गी लावलं... एक आठवड्यात पैसे परत मिळतील हे सांगितलं गेलं... तक्रार क्रमांक मिळाला..
आठवडा उलटला...
पैसे मिळाले नाहीत. 
परत फोन केला... 
- बँकेच्या होम ब्रांचमध्ये तक्रार द्या... तिथे व्हेरीफीकेशन वगैरे करुन पैसे परत मिळतील...
- ठिक ! 
..
सविस्तर अर्ज लिहीला... त्यावर तक्रार क्रमांक लिहीला, 
बँकेचा फॉर्म जोडला आणि दिला... 
त्याची ओसी हातात घेतली.... दि. २७ ऑगस्ट २०१८... नियमाप्रमाणे १२ दिवसाच्या आत !
..
नंतर दोन तीनदा चकरा मारल्या. "प्रोसेस सुरु आहे"...!
रिमाईंडर पाठवलंय वगैरे वगैरे..
एक महिना उलटला...
..
परवा मी सपत्नीक तिथे गेलो...
सोबत रिमांइडर अर्ज घेतला -
बँकेत संबंधित कर्मचाऱ्याला विचारलं. 
उत्तर मिळालं - 
रिमाईंडर पाठवलंय... !
ब्रँच मॅनेजरला भेटलो, अर्ज फोटोकॉपीसह समोर ठेवला...
..
- अरे सर आपने बोल दिया तो हो गया...
इसकी जरुरत नही है...
- नही... रखो ये - और Acknowledgement दो...!
- एक बार तो दे दिया आपने... 
- नही... रखो ये - और Acknowledgement दो...
शेवटी त्या माणसाने अर्ज घेतला... शिपायाला बोलावून फाईलला लावला... 
त्याची फोटोकॉपी समोर ठेवली, बँकेच्या 'प्राप्त' शिक्क्यासह आ.क्र. रेफरन्स लिहून परत घेतली...
... आणि त्या कागदाचा फोटो काढून डिटेल्ससह कस्टमर केअर मेलला पाठवला... त्यात एटीएम - डेबिट कार्ड - आणि कस्टमर रिलेट, झोनल मॅनेजमेंट जे कोणी होते त्या सगळ्यांना सीसी ठेवलं ... !
..
रिप्लायमध्ये "संबंधीत ब्रांचकडून अजून प्रोसेस फॉरवर्ड झाली नाहीय" हे कळालं. त्यात ब्रँच मॅनेजरही सीसी होते...! प्रकरण इनडिटेल्स चव्हाट्यावर मांडल्याने त्याच दिवशी ब्रॅंचकडून प्रोसेस झाली... आणि क्ष बँकेकडे प्रकरण गेलंय... आता सीसीटिही फुटेज वगैरे चेक करुन प्रोसेस होणार आहे... सीसीटिव्ही फुटेज मध्ये पैसे निघाले नाही त्यामूळे मी एक मिनिट चेहरा दाखवून टाटा करुन आलोय... !
...
मुद्दा असा -
कुठलंही प्रकरण असो - 
महत्वाच्या दोन गोष्टी कराव्या...
(१) "अर्ज" लिहीणं...! आणि चार ओळींचा नाही, तर पूर्ण डिटेल्स, रेफरन्स सह ! आणि त्याची एक कॉपी स्वतःजवळ ठेवायची... जेव्हा एखादं प्रकरण वाढवायची वेळ येते तेव्हा हे असे अर्ज आपली ताकद होतात...
(२) कधीही एटीएम, बँक, पेट्रोल पंप किंवा तत्सम काम करायला जा - सीसीटिव्ही शोधा आणि एक मिनिट आपला चेहरा त्यात स्पष्ट दाखवून टाटा वगैरे करायचा... पुढे कधीही गरजेच्या वेळी, थोडक्यात - नडायच्या वेळी त्या स्पष्ट फुटेजेसचा फायदा होतो... !

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved