चढ-उतार आणि डिल
माझा एक मित्र, पुण्यातल्या घराजवळ रहायचा, मूळ जळगावचा... एमबीए झालेला. २०१६ च्या सुरुवातीला आम्ही सोबतच स्वतंत्रपणे व्यवसाय सुरु केले. त्याने पुण्यात अकाऊंटस् फर्म सुरु केली, एक सीए सोबत घेवून आरओसी, अकाऊंटस्, म्यूचूअल फंड सल्ला, पॅन कार्ड वगैरे कामं करायचा... नारायण पेठेत एक छोटंसं ऑफीस घेवून व्यवसाय थाटला. दरम्यान मी मुंबईत स्थायीक झाल्यामूळे आणि फार क्षदोस्ती वगैरे नसल्याने हाय-हॅलो शिवाय फार संपर्क उरला नाही...
..
एका कामासाठी पुण्यात आलो आणि अकाउंटस् बद्दलच एक काम असल्यानं मी त्याला फोन केला. काल भेटला...! सुरुवातीला बघितलं तर हा तोच का यावर विश्वास बसला नाही, कारण आधी हत्तीसारखा असणारा आता कुपोषित गाय झाला होता... "अरे काय ? तब्येत वगैरे बिघडली कां ? असा काय झालास ?, कसं सुरुय ?
आणि त्याने हॉटेलमध्येच भाड भाड रडायला सुरुवात केली...! मागच्या दिड वर्षातलं अख्खं कर्मकांड ऐकवलं...
..
झालं असं -
व्यवसाय ऐन भरात असतांना एकेदिवशी त्याचा अपघात झाला... त्यात दोन महिने गेले, आणि आपसूक परीणाम व्यवसायावर झाला. दुखण्यातून सावरला, पण आर्थिक घडी बसवता त्याची तारांबळ उडत गेली,
परीणाम :
टोमणे, लोकांच्या नजरा, घरातल्या अपेक्षा आणि ते सावरतांना त्याची होणारी दाणादाण -
"एक एक पुर्ण करत अजून आत ओढलं जातं रे तेजा..." ...
तो भडभड बोलत होता... दोन्हीकडून आपणच फटकारले जातो...!
काही महिने त्याने पुणे सोडून जळगावात स्थायीक होण्याचा आणि तिथे जम बसवण्याचा निर्णय घेतला... पण जवळचे नातेवाईक आणि शेजारी-पाजारी लोकं यांनी अक्षरशः भांडावून सोडलं... आता तो परत पुण्यात आला, आणि सेट होण्यासाठी धडपडतोय -
आणि त्याला बऱ्यापैकी यशही दिसतंय.
परंतू या काळात त्याच्यातला उमेदिचा माणूस मात्र हरवला... !
..
एखादा माणूस काय करतो - का करतो याचं प्रत्येकी गणित वेगळं असतं... शिवाय आपलं मॅनेजमेंट आपल्याला माहीत असतं... आत्ता टिकायचंय, काहीतरी करायचंय तर "दुनिया गयी भाड मे" एप्रॉच ठेवावा लागतो... त्या मित्राला दोन मिनिटं गुरुस्थानी बसवलं आणि दोन गोष्टी शिकलो...
एक दुसऱ्यासाठी, एक स्वत:साठी...!
(१) दुसऱ्यासाठी ::
कोण काय आणि कसं करतं याच्याशी देणंघेणं न ठेवणं... किंवा त्या माणसाच्या आयुष्यातल्या काळ्या बाजू, टेंशन्स काढायचे नाही. माझं काम असेल तेवढंच बोलायचं, फुकट अक्कल वाटणं किंवा गॉसिपींग करायचे नाही... जेणेकरुन समोरच्या माणसाला अपमान, embarrassment, डिप्रेस, डाऊन, भिती, irritated वगैरे वाटणार नाही - तो माणूस आपल्याशी बोलतांना कम्फर्ट झोन मध्ये असेल.
- कारण समोरचा माणूस काय करतो, त्याचं मॅनेजमेंट, त्याच्या पुढचे प्रश्न आपल्याला माहित नसतात.
(२) व्यवसाय म्हणलं की चढउतार येणारच,
त्यात चढ असला तर उतायचं नाही,
दुर्देवाने कधी उतार असला तर लोकांना फाट्यावर मारायचं... आणि आपल्याच हिशोबाने चालायचं...!
कारण लोकं दोन्ही बाजूने बोलतात... आणि कुणीही मदतीला उभं राहत नाही...
शिवाय आपण आपल्या कम्फर्ट झोन मध्ये काम करुनच यश मिळवू शकतो... लोकांच्या बोलण्याने नाही !
- कारण आपण काय करतो, आपलं मॅनेजमेंट, आपल्या पुढचे प्रश्न फक्त आपल्यालाच माहित असतात... आपल्या फिल्डमधलं फक्त आपल्यालाच कळतं...!
...
यातलं दुसरं जर त्याने अप्लाय केलं असतं तर दिड वर्ष सहन केलेला मानसिक त्रास आणि हत्ती टू गाय हा उलटा प्रवास टळला असता...
असो,
पुढच्यास ठेच, मागचा शहाणा - प्रमाणे मी शहाणा झालो आणि त्या शहाणपणाचा तिर्थप्रसाद सगळ्यांना वाटतोय.