Bank, Me and PMO
एटीएमच्या सात हजाराचं प्रकरण फायनली सुटलं... . मागच्या एका पोस्टमध्ये म्हणालो तसं - एटीएममधून सात हजार काढायला गेलो आणि निघाले नाही, पण बॅँकेच्या खात्यातून डेबिट झाले... मग मी बॅँकेकडे तक्रार वगैरे केली पण त्यात यश मिळालं नाही... हा मुद्दा... अब आगे... . दरम्यान बॅँकेने "प्रिऑर्बीटरी व्हेरीफीकेशन प्रोसेस रिजेक्टेड" असा निर्णय दिला. रिव्हेरीफीकेशन प्रोसेस करायची असेल तर ५९८ रुपये भरा असं सांगितलं... माझे पैसे बॅँकेच्या चुकीनं गेले ते गेले, ते मिळवायच्या प्रयत्न करण्यासाठी मला परत सहाशेचा फटका बसणार होता. त्यावर "मी एक रुपयाही देणार नाही" असं उत्तर पाठवलं...! . नंतर, इथल्या सल्ल्यानूसार मी "बॅँक लोकपाल" कडे तक्रार केली... सगळं प्रकरण व्यवस्थित मांडलं... पण फार चांगला किँवा कुठलाही रिप्लाय मिळाला नाही. त्यांची डेडलाईन संपली... मग ग्राहक मंचाकडे मी रितसर तक्रार केली... . ग्राहक मंचाकडून बॅँकेकडे पाठपूरावा केला गेला... बॅँकेच्या एथोरिटीने "प्रिऑर्बिटरी व्हेरीफीकेशन रिजेक्टेट" अश्या रिप्लायने केस डिसमिसची मागणी केली... आणि ती केस...