दिवाळीची प्रार्थना... देवा...

देवा,
माझ्या गरजा भागतील इतका पैसा मला दे,
पण
तो देतांना मी ऐतखाऊ होणार नाही हे नक्की बघ...
मला मिळालेला पै न पै हा फक्त माझ्या प्रामाणिक कष्टाचाच असू दे...
मला ते कष्ट करण्याची शक्ती आणि संधी दे...

देवा,
खूप पैसा मिळाला तरी,
मी उतणार नाही, मातणार नाही ही सुबुद्धी दे,
गरजवंतावर हुकूमत चालवण्याची आणि
कमी पैसा असणाऱ्यांना तुच्छ लेखण्याची दुर्बुद्धी मला होवू देऊ नको...

देवा,
पैसा मिळवणं हे परमकर्तव्य असूनही,
केवळ तो मिळवण्यासाठी मी कुटूंबापासून दूर जाईल,
माझी कर्तव्य विसरेन -
केवळ पैश्यांमागेच पळेन अशी धारणा माझी होवू देऊ नको -
लक्ष्मी चंचल असते ही भावना माझ्यात सदैव जागृत ठेव...

देवा,
पैशांअभावी माझं कुठे अडणार नाही,
आणि पैशांमूळे मी कुणाला नडणार नाही -
इतकंच तू दे,
पण
पैशांमूळे माझ्यातला माणूस संपणार नाही -
मी माणसाचा मशिन होणार नाही याची पदोपदी जाणीव करुन देत जा...

देवा,
गरजेपूरता पैसा तू देशीलच,
पण
मी येतांनाही रिकाम्या हाती आलो,
जातांनाही रिकाम्या हातानेच जाईन -
हे मला कधीही विसरू देऊ नको...

देवा,
मला श्रीमंत कर, पण,
माझ्या हातून चार लोकांची पोटं भरतील यांचीही तू सोय करून दे...
देवा, तू पैसा दे -
आणि त्याच्या योग्य विनियोगाची अक्कलही दे,
एवढीच प्रार्थना...!
...................
तुमच्या आर्थिक प्रश्नांना सहज उत्तर मिळो,
मनात असलेल्या कल्पना पैश्यांअभावी न अडो,
तुमच्या आणि कुटूंबाच्या आर्थिक गरजा पुर्ण होवो,
पैश्यांअभावी कधीही खाली मान घालायची वेळ न येवो...
आणि, मनातल्या सदिच्छा पुर्ण होवो...
यांसह
धनलक्ष्मीची कृपा आणि आशिर्वाद तुमच्यावर सदैव - अखंड राहो !
..
''पैसा" हे जगातल्या ९० टक्के प्रश्नांचं उत्तर आहे,
बक्कळ मिळाला नाही तरी गरजा सहज भागवता येईल इतका पैसा मिळवणं हा आपला आधिकार आहे, आणि आपल्या प्रामाणिक प्रयत्नांना तो पुरवणं हे देवाचं कर्तव्य...!
......
दिवाळीच्या समृद्ध होण्यासाठी शुभेच्छा...
......

- तेजस कुळकर्णी
(TK Group of Industries)


© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved