गुरुचरीत्र पारायण
अनुष्ठानाने अनुभव येतो आणि अनुभवाने अनुभूती... गुरुचरीत्र पारायण हा अनुभूतीचा मार्ग आहे... सात दिवस तन-मन-विचार-आचार एकरुप करुन विचारांच्या पल्याड असलेली मन:शांती मिळते... ते बळ पुढचं पुर्ण वर्षभर प्रवासासाठी कामी येतं... आपण गुरूंच्या सानिध्यान आहेत, त्यांच्यावर सोडलंय - ते सांभाळतायेत ही जाणिव राहते... .. "दत्त" या देवतेने माझी नौका भरकटू दिली नाही... काही वेळा प्रवाहाच्या उलटं चालायला लावलं, प्रसंगी वादळंही दाखवले, तडाखे देवून पैलतिरादिशेने ढकललंही... पण सांभाळून घेतलं... मार्ग दाखवला... त्या मार्गावर सद्गतीने चालण्याचं बळही दिलं... आणि ते देतांना गर्वाने फुलू दिलं नाही की संकटांनी फुटू दिलं नाही... पैसा कमवायचा ? कमव... पण मातू नको ... प्रसिद्धीच्या मागे पळ - पण उतू नको... दत्तगुरूंना गाणं खुप आवडतं - म्हणून त्यांच्यासमोर कुणीही जावून धांगडधिंगा केला तर चालणार नाही, तालात रहायचं...! .. सात दिवस - काम, क्रोध, मद, मत्सर, मोह, लोभ या षड्रिपूंना आपोआप दूर ठेवलं जातं... स्वतःवरचं नियंत्रण जाणवतं, भक्कम होतं... परमात्मा-शक्ती यांसह एकरूपता होते आणि वाचा-वाणी-वि...