Brahman Reservation (ब्राह्मण आरक्षण)
ब्राह्मण आरक्षण...
#ब्राह्मण_आरक्षण
..
पहिला मुद्दा : आरक्षण इतकं सहज मागितल्याने आणि इतकं लगेच मिळत नाही... सरकार स्तर ते कोर्ट असं लढावं लागतं... त्यातही व्यापक स्तरावर लढा उभारावा लागतो... माणूस ते माणूस प्रत्येकजण त्यात सहभागी व्हावा लागतो... बरंच मोठं प्रकरण आहे... आत्ता मागणी केली, अखंड आणि प्रभावीपणे लढलं तर माझ्यासारख्या पंचवीस ते तीस दरम्यान असणाऱ्या मुलांच्या मुलांच्या मुलांना आरक्षण मिळू शकतं... आणि प्रत्यक्ष्य फायदा त्यांच्या मुलांना...!!
.
आरक्षणाची गरज आहे कां ? -
आरक्षणाची नाही पण आर्थिक आधाराची आणि सामाजिक सुरक्षेची गरज ग्राउंड लेव्हलवर खरंच आहे.
(ग्राउंड लेव्हल : शहरी मध्यमवर्गीय आणि त्याखालील स्तर, ग्रामीण भागातील ब्राह्मण, शेतकरी)
शिक्षणासाठी फि देणं बऱ्याच लोकांना परवडत नाही हे एकदम सत्य आहे... आणि त्यामूळे नोकरी व्यवसायात ब्राह्मण मुलं कमी पडतात. पिढी दर पिढी कुटूंबचं कुटूंबे गरीबीत राहतात.
.
आरक्षणाचा विचार केला तर जो समाज मागासवर्गीय आहे त्या समाजाला आर्थिक, सामाजिक मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण देतात. मराठा आरक्षणादरम्यान दिसलं तसं सर्वेक्षण वगैरेतच गोष्टी दिसतात. या तत्वानूसार ब्राह्मणांना आरक्षण मिळणं आणि मिळालं तरीही कोर्टात टिकणं खुप कठीण आहे. (अशक्य नाही.)
.
त्यामूळे जरी योग्य वाटत असली तरीही आरक्षणासाठीची मागणी टिकावू नाही...
मग उपाय काय ?
.
ब्राह्मण समाज बुद्धीवादी आहे.
त्यामूळे पाया दिला तर कुणाचीही मदत न घेता ब्राह्मण व्यक्ती किमान पोटापाण्याइतका आणि देश-धर्म हितासाठीचा पैसा, समृद्धी उभारु शकतो.
.
यावर टिकावू आणि रास्त मागणी काय ?
तर,
आरक्षण न मागता -
ब्राह्मणांसाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन करण्याची मागणी करणे...!
ज्यात उद्देश केवळ आर्थिक आधार मिळवणे हाच असावा.
अगदी व्यवस्थित मांडायचं तर -
१. दहावी नंतरच्या पुढील महाविद्यालयीन शिक्षण शुल्कात ब्राह्मण विद्यार्थ्यांना दिलासा देणं. आणि गरीबातल्या गरीबाला परवडेल तितकी फी माफ करणं... (किँवा ईबीसीची मर्यादा वाढवणे)
आर्थिक परिस्थितीच्या निकषावर दिलासा देणे...
- यात किमान गुणांची मर्यादा अट कमी केली नाही तरीही चालणार...!
२. उद्योग व्यवसायासाठी ब्राह्मण मुलांना प्रामाणिकपणे, आणि शक्य तितकं सहज कर्ज उपलब्ध करुन देणे...!
या दोन गोष्टी साध्य झाल्या तरीही ब्राह्मणांचा सहज उत्कर्ष होईल. यात गुणवत्तेबरोबर कुठलिही तडजोड नको. कारण गुणवत्तेला तडजोड म्हणजे बुद्धीशी गाठ असते... तसली अपेक्षा नकोच... स्पर्धा व्हायलाच हवी...!
.
शर्यतीत पळणाऱ्याने रनिँग शूज, एनर्जी ड्रिँक, रनिँग सूट याची मागणी करावी - पण शर्यतीचं अंतर कमी करण्याची नको...
.
सरकारी नोकरी, खासगी संस्था यांत ब्राह्मण मुलं गुणवत्तेच्या आधारे टिकू शकतात... टिकत आहेतच... पण आर्थिक भार कमी केला तर जगणं सुकर होईल.
.
काल एका वृत्तपत्राने ब्राह्मणांतील युवा उद्योजक म्हणून आरक्षणाच्या मुद्यावर कॉफीटेबल डिक्शशनला बोलावलेलं... मी तिथे हा मुद्दा मांडला... बहूतेकांना पटला - बहूतेकांना नाही... सहमतीचा आग्रह नाही. पण आरक्षणापेक्षा आर्थिक दिलासा मिळवणं हेच योग्य आणि टिकावू ध्येय आहे...!
.
- तेजस कुळकर्णी