Posts

Showing posts from September, 2019

RIP विजू खोटे

Image
मराठी वा हिँदी चित्रपटसृष्टीत बरीच मंडळी सहकलाकार म्हणून जन्माला आली, सहकलाकार म्हणूनच संपली... अभिनयाच्या बाबतीत अमिताभ बच्चनना तोडीस तोड असूनही आणि अख्खी हयात इंडस्ट्रीला देवूनही चित्रपटाचे मुख्य नायक होणं त्यांच्या नशीबात नव्हतं... तरीही, भारतीय चित्रपटसृष्टीतलं मानाचं पान ते ठरले - अध्याय ठरले ! त्यांच्याशिवाय भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास पूर्ण होणार नाही. . "विजू खोटे" हा अध्याय आज संपला ! चित्रपटसृष्टीतलं विजू खोटे पर्व संपलं. . भारदस्त आवाज, करारी चेहरा, आणि जबरदस्त अभिनय क्षमता असलेल्या या माणसाने पदरी पडलेल्या खलनायकी भूमिकांचं सोनं केलंय. "कितने आदमी थे ?" या ऐतिहासिक प्रश्नाचं ऐतिहासिक उत्तर देणारा आवाज शांत झाला. . विजू खोटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. - तेजस कुळकर्णी

पीएमसीच्या निमित्ताने -

Image
पीएमसीच्या निमित्ताने - . सहकारी बॅँका ग्रामीण भारताची अर्थव्यवस्था आहेत. आणि या क्षेत्राला शतकोत्तर इतिहास आहे... असं असलं तरीही, सहकारी बॅँका आणि राष्ट्रीयकृत बॅँका यांत जमीन-अस्मानाचा फरक आहे... रात्री शांत झोप हवी असेल तर पैसा राष्ट्रीयकृत बॅँकेत ठेवा. . सहकारी बॅँकेचं व्याजदर आत्ता १०-१२ टक्के आहे, राष्ट्रीयकृत बॅँकांचं ६-७ टक्के... पण सहकारी बॅँकांना सरकारी कव्हर हे असून नसल्यासारखं असतं. तिथे राष्ट्रीयकृत बॅँकेतला पै न पै सरकारची जबाबदारी असते. पूर्वी राष्ट्रीयकृत बॅँक ांची संख्या आणि शाखांचा विस्तार मर्यादित होता. मोठ्या शहरांमध्येच फक्त शाखा असायच्या. त्यामूळे ग्रामीण भागात सहकारी बॅँक, पतपेढ्यांचं पेव फुटलं होतं... ज्याचं सार्वभौमत्व संचालक मंडळाकडे आहे. कारखान्यांवर काम करणारी माणसं, शेतकरी, कष्टकरी, मध्यमवर्गीय यांनी पै न पै साठवून या संस्था वाढवल्या... बॅँकाच्या तुलनेने दुप्पट व्याजदर, सहज कर्ज देणं या बळावर ठेवीदार वाढवले आणि संस्था फुगल्या. यातूनच बऱ्‍याच पुढाऱ्‍यांचा जन्म झाला. . सारस्वत सारख्या संस्था अजूनही जिवंत आहेत. परंतू बऱ्‍याच सहकारी संस्था या त्यातील संचालका...

"बाप्पाला निरोप"

"बाप्पाला निरोप" हि कंन्सेप्ट मूळातच वाह्यात आहे. त्यात ते रडणं बिडणं तर अति होतं... सूतक पडल्यासारखं तोँड पाडून बसायचं काय, रडायचं काय... अति भक्ती दाखवण्याचे प्रकार आहेत हे ! . आज फक्त दहा दिवसांचा गणेशोत्सव संपतो ! गणपती बाप्पा पृथ्वीतलावरुन पुन्हा वर्षभरासाठी निघून जातात वगैरे असं काहीही नसतं. मूळात उत्पत्ती-स्थिती-लय या तिन्ही अवस्थांचं मूळ जिथे आहे त्यांना पृथ्वीवरुन घालवणारे आपण कोण ? मूलाधार चक्रात, चराचरात, ध्यान्यात, देव्हाऱ्‍यातही ते आहेत ! . गणेशोत्सवाच्या आधी ते पार्वती लहान गणपतीला खाऊ वगैरे भरुन देते, गणपती भावूक होतात वगैरे व्हॉटस्अॅपच्या शोधानंतरचे चाळे आहेत. कामधंदा नसलेल्या कवीँचे. आता उद्यापासून पार्वती विचारणार की काय केलं बाळा पृथ्वीवर दहा दिवस ? चे मेसेजेस सुरु होतात. . ते एखाद्या लग्नात बिदाईच्या वेळी ज्याचं देणं न घेणं तो रडायला लागतो, कारण तसंच वातावरण तयार होतं. सेम तेच लोकांनी आजच्या दिवसाचं केलंय.... गणपती चालले, आता वर्षभरानेच भेटणार... काहीँना कसलंच नसतं - उद्यापासून पार्टी-शार्टी सुरु करण्यासाठी ते मनात पक्क हेच ठरवतात. उद्यापासून वर्षभर ऐ न च...

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved