"बाप्पाला निरोप"

"बाप्पाला निरोप"
हि कंन्सेप्ट मूळातच वाह्यात आहे. त्यात ते रडणं बिडणं तर अति होतं... सूतक पडल्यासारखं तोँड पाडून बसायचं काय, रडायचं काय... अति भक्ती दाखवण्याचे प्रकार आहेत हे !
.
आज फक्त दहा दिवसांचा गणेशोत्सव संपतो !
गणपती बाप्पा पृथ्वीतलावरुन पुन्हा वर्षभरासाठी निघून जातात वगैरे असं काहीही नसतं. मूळात उत्पत्ती-स्थिती-लय या तिन्ही अवस्थांचं मूळ जिथे आहे त्यांना पृथ्वीवरुन घालवणारे आपण कोण ? मूलाधार चक्रात, चराचरात, ध्यान्यात, देव्हाऱ्‍यातही ते आहेत !
.
गणेशोत्सवाच्या आधी ते पार्वती लहान गणपतीला खाऊ वगैरे भरुन देते, गणपती भावूक होतात वगैरे व्हॉटस्अॅपच्या शोधानंतरचे चाळे आहेत. कामधंदा नसलेल्या कवीँचे. आता उद्यापासून पार्वती विचारणार की काय केलं बाळा पृथ्वीवर दहा दिवस ? चे मेसेजेस सुरु होतात.
.
ते एखाद्या लग्नात बिदाईच्या वेळी ज्याचं देणं न घेणं तो रडायला लागतो, कारण तसंच वातावरण तयार होतं. सेम तेच लोकांनी आजच्या दिवसाचं केलंय.... गणपती चालले, आता वर्षभरानेच भेटणार... काहीँना कसलंच नसतं - उद्यापासून पार्टी-शार्टी सुरु करण्यासाठी ते मनात पक्क हेच ठरवतात. उद्यापासून वर्षभर ऐ न चैन मज्जानी लाईफ...
.
आज गणेशोत्सव संपला, उद्यापासून महालया पक्ष, मग नवरात्र, लगेच दसरा - दिवाळी, मग कोजागिरी वगैरे येतं, ते होतं तर आता कॉमन झालेलं ख्रिसमास-थर्टी फर्स्ट, मग संक्रांत, होळी, गुढीपाडवा, वारीला जाणाऱ्‍यांची गर्दी, आला श्रावण, परत लगेच गणपती ! चालूच राहणार हे !
.
गणेशोत्सवातील सुंदर प्रथा म्हणून आजचा दिवस साजरा करा. आनंदात ! रडत नको ! गणपती बाप्पा सांगत नाही तुम्ही फक्त हे दहाच दिवस माझी सेवा करा, वर्षभर करा ! आनंदच आहे !

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved