आरेचं जंगल


आरे मिल्कमध्ये घर घेतांना तिथलं निसर्ग हे एकमेव कारण समोर ठेवलेलं... मुंबईच्या गर्दीत राहूनही शहरापासून बाहेर, जंगलाच्या मध्यात राहण्याचा अनूभव देणारं ते ठिकाण आहे. चार लाखाच्या आसपास असणाऱ्‍या डेरेदार वृक्षांमूळेच मुंबईच्या धोकेदायक प्रदुषणातही किमान उपनगरांत तरी वातावरण संतुलीत राहतंय.
.
सरकारच्या बाजूचा गट सांगतोय... -
मेट्रो कारशेड अत्यावश्यक आहे.
आरेतल्या चार लाख झाडांपैकी सत्तावीसशे तोडली तरी फार फरक पडणार नाही.
समोरच्या गटातील मंडळी राजकारण करताय वगैरे ...
.
तूर्तास मान्य !
वृक्षतोडीस विरोध करणारा गट राजकीय हेतू मनात ठेवून स्पॉन्सर्ड असेल.
त्यांचं बॅकीँग कुणीतरी भलतंच असेल...
पक्या वगैरे मंडळी फोटोसाठी थोबाड घेवून आलीत...
मान्य !
.
पण आरे परीसरात राहण्याचा अनुभव, आणि झाडांची वाढ, फायदे, प्रदुषण, झाडांची गरज यां मुद्यांवर किमान प्रिप्रायमरी पर्यँत झालेलं शिक्षण यांचा विचार केला तरीही झाडांची कत्तल चुकीचीच आहे हेच कळतंय...
.
ज्या अवस्थेत झाडं कापली ती वाढायला सरासरी किमान तीन वर्ष लागतील. जास्तही ! त्यापेक्षा कमी नक्कीच नाही...
झाडं कापायला दोन दिवसांचा वेळ पूरे.
इतकी झाडं परत लावण्याचा कार्यक्रम शून्य. म्हणजे गेले ते गेलेच.

.
मेट्रोशेड उभारण्यासाठी तीच जागा योग्य आहे असं भिडेबाई बोलताय, पण त्यासाठी पर्यायी जागा शोधली नाही कां ?
आरेचं जंगल आता डोळ्यात आलंय... आज मेट्रोकरता, उद्या मोनोकरता, नंतर क्रिकेट स्टेडीयम, म्हाडा, ऑफीस, कुणाचंतरी स्मारक यांसाठी सुद्धा जंगल तोडलं जाईल. सेव्हीँग संपत जातं तसं एक एक झाड संपेल आणि आरे मिल्कचा निसर्गरम्य परीसर भकास होईल.
.
भविष्यात
भिडेबाई सेवानिवृत्त होतील.
फडणवीस केँद्रात जातील.
ठाकरे मंडळी पुन्हा खंजीर, मावळे, गनिमी कावा वगैरे खेळण्यात गुंग होतील,
जितू, पक्या वगैरे अडगळीत पडतील,
मॉडेल्स म्हाताऱ्‍या होतील
पण
आरे मिल्क स्टेशनला मेट्रोत बसणाऱ्‍या प्रत्येक आरेकरची या सत्तावीसशे झाडांना गमावल्याने झालेली दुखरी जखम मात्र दरवेळी ठणकत जाईल.
.
(एडीटेड)
मुद्दा सरकारची बाजू चूक किंवा पर्यावरण वाद्यांची बरोबर, किंवा पर्यावरण वाद्यांची चूक सरकारची बरोबर हा नाहीय.
.
किंवा,
मेट्रो नको -
हा सुद्धा नाहीय.
.
मेट्रो हवीय - गरज आहे.
त्यामूळे प्रदुषणावर नियंत्रण मिळेल हे सुद्धा आहे.
दुमत नाही.
फक्त
मुद्दा हाच आहे -
की ही पर्यावरणाची तूट भरून निघायला हवी.
ती कशी ?
तर,
(तुमचं मत कुठल्याही बाजूचं असू द्या. -)
१. २७०० झाडं तोडून मेट्रो उभी राहतेय तर शक्यतोवर प्रवास त्यानीच करावा. गाडीचा वापर टाळा.
२. गरज नसेल तर "अजून" झाडं तोडू नये.
३. शक्य झालं तर घरचं कार्य समजून झाड लावणं
वगैरे.
..
मी सरकारचा विरोध किंवा पर्यावरणवाद्यांचा सपोर्ट करत नाहीय,
फक्त -
दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा जीव जातोय, ते नको.

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved