Dhule, Gote and Elections
धुळे शहरात तुला ना मला घाल ...ला....
.
लोकसंग्रामचे गोटे, अपक्ष कदमबांडे यांच्या लढतीत एमआयएमचा उमेदवार निवडून आलाय...!
.
माझं मतदान याच मतदारसंघात आहे...
.
हे धक्कादायक झालंय...!
..
काय झालं ?
धुळे शहरात मतदान झालं ५० टक्के - त्यालाही कमी.
अनिल गोटे यांचा पिंड संघाचा आहे, आणि धुळ्यात त्यांनी केलेली कामे तुफान आहेत. त्यामुळे लोकांनी ३ वेळा केवळ त्यांच्या नावावर निवडून दिलं. अगदी यावेळी देखील तेच येतात असं चित्र होतं.
भाजपचे आमदार अनिल गोटेंनी आधी महापालिका, मग लोकसभेवेळी भाजपाची पिसे काढली होती. ज्यामुळे गिरीश महाजन शहरात येऊन अनिल गोटे कसे जिंकतात हे मी बघतोच वैगेरे गोष्टी करून गेले.
शहर विधानसभा सुटली सेनेला - आणि सेनेने जो उमेदवार दिला तो मुळात शहरात लढायलाच तयार नव्हता. त्यांचं होमपीच धुळे ग्रामीण (धुळे बाह्य भाग) आहे. त्याला ऐनवेळी उभा केला. त्यामुळे अर्धी लढाई इथेच संपली.
दुसरा उमेदवार अपक्ष उभा होता (फुगा)... ज्यांच्याकडून गोटेंना फाईट मिळेल असं वाटलं. ते उमेदवार आधी राष्ट्रवादी मधून बाहेर पडले, आणि अपक्ष लढले.
जिथे शहरात विकास हा एकमेव मुद्दा होता तिथे गोटे नको म्हणून भाजप, संघ वैगेरेने उघड अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला. (असं ऐकलंय.. खरं खोटं तो जाणे) ज्यांना एमआयएम असूनही मुस्लिम मतांपैकी ४० टक्के मतं सहज मिळतील अशी परिस्थिती आहे, त्यांच्यासाठी ग्राउंड लेव्हल प्रचार करून तब्बल ३५००० मते वळवली गेली.
या गोंधळात भाजप, संघ आणि शिवसेना यांचं एमआयएम या छुप्या पक्षाकडे लक्ष गेलं नाही, आणि अप्रत्यक्षपणे त्याला मदत झाली.
परिणामी संघाशी एकनिष्ठ, धुळ्यासाठी जीव ओतणारा माणूस दुर्दैवीरित्या पराभूत झाला.
धुळे शहरात आज ज्यांच्याशी बोललो त्यांच्या याच भावना आहेत.
भाजपाने कुठेतरी समंजसपणा दाखवला असता, किंवा सेनेनी वेळीच गोटेंना ओळखून तिकीट दिलं असतं तर आज महायुतीचं एक सीट वाढलं असतं.
धुळे शहरही आनंदी झालं असतं.
असो.