Raju Parulekar - Devendra Fadanavis Insider Interview
परुळेकर - फडणवीस इनसाईडर चॅनेलची मुलाखत वेळ मिळेल तसं तीन-चार दिवसात बघून संपवली...
...
फडणवीसांची आजपर्यंतची सर्वांत चांगली मुलाखत म्हणजे ही मुलाखत झालीय... तो माणूस मूळातच जबरदस्त आहे, पण जबरदस्त माणसाला बोलतं करण्यासाठी मुलाखत घेणाराही त्या तोडीचा असावा लागतो...
राजू परुळेकरांना श्रेय द्यायलाच हवं... फडणवीस परुळेकरांना मुलाखत देतायेत ऐकल्यावर विरोधाच्या सूरात माझाही सूर होता, पण मुलाखत बघीतल्यानंतर फडणवीसांनी जे केलं ते योग्य केलं हे समजलं...!
...
परुळेकर जुन्या फळीतले पत्रकार आहेत,
त्यांची काही मतं पटत नाहीत, काही १०० टक्के पटतात - (स्पेशली : शिवसेनेबद्दलची...!)
जसं, जगाचा-देशाचा अभ्यास नसेल, पण मुंबईसह महाराष्ट्राची आणि ठाकरसेनेची नस ते जाणून आहेत, परखड आहे...
आणि मूळात हल्लीच्या जाधव, सरदेसाई वगैरे फडतूस लोकांसारखं बोलणाऱ्याला इन्टरप्ट न करता उत्तरं देण्यासाठी पुर्ण वेळ दिला...!
चांगलं ते चांगलं म्हणायलाच हवं...
परुळेकरांनी मुलाखत व्यवस्थित हँडल केली... अर्थात "ट्रोलर्सना सौम्य घ्यायला सांगा..." हे सांगणं त्यामागे आहेच... परुळेकरांची प्रतिमा थोडी का होईना, पण सुधारली...!
...
फडणवीसांनी उठांची कार्यपद्धती, आधारवडाची पाळंमूळं, उठांनी फोन न घेणं, राऊत, फेक ट्रोलर्स, जात, अमृता फडणवीसांवर होणारी घाणेरडी टिका, वैयक्तीक आयुष्यावरचे प्रश्न यांना शांततेत उत्तरं दिलीत... कुठेही ऐतिहासिक ओव्हरअॅक्टींग नाही, घाण शब्द नाहीत, एकच शब्द तीनदा बोलणं नाही, राऊतासारखं डोळे बघ डोळे बघ नाही...!
...
शेवट जोरदार : पुढच्या वेळी तुम्ही मोठ्या पदावर असाल आणि त्या पदाच्या जबाबदारीच्या योग्यतेचे प्रश्न विचारेन...
इनसाईडरमध्ये उ.ठा. आलेच कधी तर हे वाक्य त्यांच्यासाठी बोललं जाणार नाही हे मात्र खरं...
...
आपल्या वैचारिक विरोधकाला दिलखुलासपणे हसत खेळत मुलाखत देणं आणि त्याच्या मनातलं आपल्या विषयीचं मत सकारात्मक करणं हे प्रत्येकालाच जमतं असं नाही, देवेंद्रजी इथे जिंकतात...
आणि आपल्या विचारांपेक्षा पेक्षा वेगळं मत असणाऱ्या व्यक्तीला बोलतं करणं, त्याच्याविषयी जाणून घेणं, त्याची बाजू ऐकणं हेही प्रत्येकालाच जमतं असं नाही, इथे परुळेकर जिंकतात...!