SayNoToLockdown

(राजकीय मताचा चष्मा उतरवूनच वाचा...)

मार्च ते जून लॉकडाऊन केल्यानंतर, उद्योगधंद्याचं श्राद्ध घालून आणि सगळं विस्कळीत होवूनही जर जुलैमध्ये परत लॉकडाऊन लावावं लागत असेल तर तर ते मोदींपासून, उद्धव ठाकरेसकट आपल्या शहराच्या महापौरापर्यंत सगळ्यांचं अपयश आहे...!
...
मोदी, ठाकरे येतात - भाषण देतात - जातात,
रिकव्हरी प्लान, बाहेर पडण्याचा रोडमॅप कुणाकडेही दिसत नाहीय...
पंधरा पंधरा दिवसाची स्किपींग सुरु आहे एवढंच दिसतं.
प्रामाणिक विचार केला तर केंद्र असो वा राज्य, पहिला पेशंट सापडल्यापासून अक्षम्य चूका झाल्यात..एअरपोर्ट स्क्रिनींग कमी पडलं, धोका ओळखण्यात चुक झाली, लॉकडाऊन लावतांना मिसमॅनेजमेंट झालं...! राज्यातल्या तिघाडी सरकारचा प्रश्नच नाही... तिथे एक से एक नग भरलेय... स्थानिक प्रशासन हौस म्हणून लॉकडाऊन लावतं, त्यावर कुणाचा कंट्रोल नाही... जिल्हाधिकारी-पोलीस राजे झालेय...
गोंधळ गोंधळ गोंधळ घातला जातोय.
...
बेशुद्ध पडलेले उद्योगधंदे बघितल्यानंतर इमॅजनरी मधुन जेव्हा फॅक्टवर येतो तेव्हा कळतं...!
उद्योग परत सुरु करायचे तर रिस्टार्ट करण्यासाठी किती धडपडा असेल आणि त्यातही किती आधिकारी, मंत्री सहन करावे लागतील याचा विचार आला तरी काटा येतो...!
...
मुंबई एमएमआर, पुणे रिजन, औरंगाबाद इथल्या बऱ्याच उद्योजकांची सहनशक्ती आता संपण्याच्या मार्गावर आहे... उद्रेख झाला तर आवरणं कठीण होईल...
उद्योजक काय - प्रत्येकाचीच सेम गोष्ट आहे... वर वर नॉर्मल दिसत असलं तरीही प्रत्येक घरात ती सणक पोहचलीय... आर्थिक प्रश्नाला उत्तर नसतं, ज्यांच्याकडे आज दोन वेळ खायचे वांधे झालेय त्यांना विचारा...!
मोदी मोदी करणारेही केंद्रसरकारच्या नावे बोटं मोडताय आणि एकनिष्ठ राहणारे शेणीकही राज्यसरकारला शिव्या काढताय.
पहिला एक महिना मज्जेत, दुसरा महिना सहकार्य ठेवून, तिसरा नाईलाजास्तव सहन केलाय, पण चौथा म्हणजे सहनशक्तीचा अंत असेल...
फक्त राज्याबद्दलच नाही, तर केंद्राबद्दलही हेच मत होतंय...
व्यक्तीसापेक्ष - कुणाला उचक्या लागत असतील तर कुणाला तळतळाट....
...
मोदींच्या आजपर्यंतच्या ६ वर्षांच्या काळाला लाभलेली काळी किनार म्हणजे कोरोना हाताळण्यातही गडबड. मोदी कुठे कमी पडले असं विचारलं तर कट्टर मोदीसमर्थक असुनही माझं उत्तर मोदी कोरोना हाताळण्यात कमी पडले हेच असेल...
अर्थात त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या असतील...!
बाकी उद्धव ठाकरेंच्या सत्तेचा रंगच काळा असल्याने त्यांच्या पुस्तकाची पानं वाढतील इतकंच... कोरोना कळस झाला, आधी सरकार तयार करणं, लोकांच टक्कल करणं आणि स्थगिती सम्राट पदापर्यंत पोहचतच त्यांच्यासह मंत्र्यांवर बिनकामाचा मंत्री असा शिक्का बसलाच होता.
...
याचा शेवट जेव्हा होईल तेव्हा नागरिक म्हणून
केंद्रसरकार, राज्यसरकार यांसह जिल्हा प्रशासन, महानगर प्रशासन, पोलीस यांच्याकडे अतिआदराने बघणाऱ्या नजरा कमी असतील... डोळसपणे बघितलं जाईल... आयएएस-आयपीएस-मिनिस्टर तुझ्या घरी, कामाचं बोल हा अॅटिट्यूड असेल...
तोच लोकशाही बळकट करेल !
कारण Fundamental Rights ची किंमत कळलीय.
...
तुर्तास,
लॉकडाऊनला विरोध सुरु झालाय...
टिकायचं असेल तर विरोध व्हायलाच हवा..
#SayNoToLockdown
#DoUnlock

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved