Drawings

माझं अडीच वर्षाचं लेकरु हुक्की आली की एक पेपर-पेन घेऊन येतं आणि पुढचा किमान तासभर एक एक ऑर्डर सोडतं... कालपासून हा नवीन उद्योग सापडलाय.
...
पप्पा, मून काढ... स्टार काढ... त्यात एक एका कलरची व्हरायटी. 
पप्पा, गाडी काढ... मग त्या गाड्यांच्या व्हरायटी निघतात. तुटकी गाडी, रेड गाडी, येल्लो गाडी, ग्रीन गाडी, पप्पाची गाडी, काकाची गाडी... मग ती गाडी बघून फिरायला जायचं आठवतं, काल संध्याकाळ पासून चार वेळा भुर्रर्रर्र चक्कर झालाय.
गाडी, चोकोबार, चॉकलेट, एसी, श्रीयानचा शर्ट, श्रीयानचा हात, पप्पाचा हात, मम्मा, फोन, पंखा, चिऊ, काऊ, हत्ती, घोडा, मूनचा हात, बस, चाक आणि त्या प्रत्येकाच्या पाच-सहा व्हरायटी असं सगळं प्रकरण सुरु आहे...
...
गोल गोल काढून त्याला डोळे, नाक, शेंडी लावली आणि ही कोण असं विचारलं की बरोब्बर सांगतो. 
..
कालपासून शंभर-एक चित्रं आणि त्या चित्रांची मापं काढली गेलीय,
त्याचं मन भरेपर्यंत नॉनस्टॉप सुरु असतं.
एकूण सगळं खूप जबरदस्त आहे.

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved