Nupur Sharma and India

नुपूर शर्माना निलंबित केल्या बद्दल शेवटची पोस्ट..
लेख मोठा आहे वेळ काढून अवश्य वाचा!

आपण Information Age माहिती युगात जगत आहोत... हे युग हे सोशल मीडियाचे आहे, प्रगत तंत्रज्ञानाचे / Advance Technologies च आहे...Hybrid Telecommunications/ उच्चस्तरीय दूरसंचाराचे आहे... Hybrid Warfare/ हायब्रीड वॉरफेअरचे आहे.
पुढे जाण्यापूर्वी Hybrid Warfare /हायब्रिड वॉरफेअर समजून घेणे महत्त्वाचे आहे.

information Age माहिती युगातील लढाया युद्धभूमी ऐवजी इंटरनेटवर, स्टॉक एक्स्चेंजमध्ये,बायो लॅबमध्ये, तुमच्या बुद्धिजीवी/ intellectual आणि institute/संस्थांद्वारे  लढल्या जाणार. या लढाईत कोणतही हत्यार, शस्त्र नसते.. narratives असतात,पोस्ट, ट्विट द्वारे, Data hacking होते, Phishing असत, असे वेगवेगळे मार्ग वापरले जातात.. 

सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे एक Conventional War पारंपरिक युद्ध आहे...ज्यामध्ये बॉम, दारूगोळा, मिसाईल ही पारंपारिक शस्त्रे वापरली जात नाहीत.. कमीत कमी संसाधनांचा वापर करून आपल्या शत्रूचे जास्तीत जास्त नुकसान करणे, त्यांना गोंधळात टाकणे आणि त्यांना तोडणे.... एवढेच या युद्धाचे एकमेव उद्दिष्ट आहे.

जेव्हा एखादा देश आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि बौद्धिकदृष्ट्या तुटलेला असतो, तेव्हा तो जिंकणे खूप सोपे असते... कारण तेव्हाच शत्रूच्या छावणीतील लोकच आक्रमणकर्त्यांच्या मदत करतात. ... Inroads  आणि प्राणघातक स्ट्राइक साठी योग्य वातावरण निर्माण करण्यात मदत करतात.. असो. मूळ मुद्द्याकडे परत येऊया...

ज्ञानवापी परिसरामध्ये सर्वेक्षणादरम्यान शिवलिंग सापडल्याची बातमी आली... हिंदूंसाठी ते शिवलिंग आहे, तर मुस्लिम बाजू ते कारंजे असल्याचे सांगत आहेत.... आता जे काहीही असेल ते न्यायालय सांगेल आणि त्यासाठी आवश्यक पुरावे आधीच सादर केले आहेत..

आता येऊ मीडियाकडे.. ही बातमी आल्या पासून न्यूज चॅनल वर ब्रेकिंग न्यूज चा अक्षरश मासे बाजार भरलेला आहे..
दोन्ही पक्षांच्या लोकांना बसवून दिवसभर चर्चा व्हायची.
ही धार्मिक बाब असल्याने त्यावर आवश्यक संयम आणि संवेदनशीलता बाळगायला हवी होती पण तसे झाले नाही.

एका पक्षाने चुकीचं बोलणं चालूच ठेवलं..म्हणून रागाच्या भरात दुसरा पक्ष काहीतरी बोलला आणि गदारोळ झाला....
न्यूज चॅनलने दोन्ही बाजूंचे वक्तव्य कापायला हवे होते...पण टीआरपीसाठी क्लिप तशीच ठेवली आणि दिवसभर चालवली.. व्हायरल केली तर केली पण नंतर ती एडिट केली गेली..

चुकीचे संदर्भ लावण्यात आले आणि हा गुन्हा आहे, असे सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मला आठवते, जेव्हा हा मुद्दा उचलला गेला तेव्हा Alt News ने हा व्हिडिओ मोडून तोडून प्रसारित करण्यास सुरुवात केली..
त्याचवेळी फोटोशॉपने कंबर पातळ करणाऱ्या पत्रकार मॅडमने थेट इस्लामिक जगताशी संपर्क साधण्यास सुरुवात केली.

अशा प्रकारे सांगितलं व दाखवलं गेलं की जस काही खूप मोठ महापाप केलं आहे.
नुपूर शर्मा जे म्हणाल्या, त्याचे संदर्भ हदीसमध्येही आहेत आणि प्रसिद्ध इस्लामी धर्मोपदेशक झाकीर नाईक यांनीही याच शब्दात अनेकवेळा तेच सांगितले आहे.
याचे सर्व व्हिडिओ ही आहेत....
पण इथे गोष्ट ती नव्हतीच. हे एक निमित्त होतं ज्यासाठी हे लोक 8 वर्षांपासून वाट पाहत होते.. आणि संधी मिळाली.
या घटनेला आठवडा उलटून गेला होता तरी फारसा गोंधळ झाला नव्हता..

जर भाजप भ्याड असती तर नुपूरला त्याच दिवशी निलंबित केले असते पण नाही केले….मग आज का केले???
3 जून ही तारीख या बाबतीत खूप महत्त्वाची आहे.... या दिवशी राष्ट्रपती आणि पंतप्रधानही कानपूरच्या दौऱ्यावर होते. त्याच दिवशी नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ बाजार बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आली.
या घोषणेला हिंदू पक्षाने विरोध केला.त्यानंतर दोन्ही बाजूंनी दगडफेक झाली. त्यानंतर पोलिसांची कारवाईही झाली. यात पीएफआय, एआयएमआयएमचा हात आहे, तर मुख्य सूत्रधार काँग्रेसचा नेता आहे.

संध्याकाळी जेव्हा पोलिस दंगलखोरांना अटक करत होते.. त्याच वेळी इजिप्तच्या "इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर द सपोर्ट ऑफ द प्रोफेट ऑफ इस्लाम" IOSP ORG  ने या विषयावर ट्विट करण्यास सुरुवात केली..... त्यांनी सुमारे 60 ट्विट केले आणि एक विशेष हॅशटॅग देखील चालवला.

या सर्व ट्विटमध्ये पंतप्रधान मोदींचा फोटो होता आणि हिजाब आणि इतर मुद्द्यांवर लिहून भारतात एका विशिष्ट वर्गावर अत्याचार होत असल्याचे सांगण्यात आले.
ट्विटला वेग आला आणि 4 जून रोजी त्यांची संख्या सर्वाधिक झाली..... तर गेल्या 2 दिवसात अशा प्रकारचे ट्विट मोठ्या प्रमाणात येण्यामागील मुख्य कारण म्हणजे समन्वयित प्रयत्न/ coordinated efforts..पण कोणाचे??
Alt News, PTI, South Asian Index... सारख्या हॅण्डल चे... आणि त्यांना साथ दिली IOSPI org जी एक muslim brotherhood ची एक media org आहे.

काही महिन्यांपूर्वी याच संघटनेने फ्रेंच सरकारविरोधात बॉयकॉटची मोहीम सुरू केली होती.
सौदीपासून पाकिस्तानपर्यंत.. प्रत्येक देशाने फ्रेंच सरकारला विरोध करण्यासाठी मोहिमा चालवल्या.. त्यामागे IOSPI होती.

5 जून रोजी अरबच्या काही मोठ्या ट्विटर हँडल्स, काही सेलिब्रिटींनी या विषयावर पोस्ट करण्यास सुरुवात केली.... कोणी भारतीय वस्तूंवर बहिष्कार टाकत होते, कोणी भारतीय कर्मचार्‍यांना काढून टाकण्याबद्दल बोलत होते.

हे प्रकरण देशाबाहेर गेले होते....किंवा देशाबाहेर नेले गेले होते!!
OIC ही इस्लामिक देशांची संघटना आहे, ही बातमी तिथेही पोहोचली...भारतात काय झाले, काय घडले याची त्यांना पर्वा नव्हती...
प्रोपोगंडा असा चालवला गेला की पंतप्रधान मोदींच्या जवळच्या एका नेत्याने पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल चुकीचे वक्त्यव केले..

इथला फरक समजून घ्या... एखाद्या सामान्य नेता किंवा झाकीर नाईक ने असे वक्तव्य केले असेल तर त्यांना त्यावर काही हरकत नाही.. पण मोदींच्या जवळच्या एका नेत्याने वक्त्यव करताना जेव्हा हे शब्द वापरले जातात तेव्हा प्रकरण दुसरीकडे नेले जाते... आणि तेच घडले.
इस्लामिक देशांना याच्याशी काही देणंघेणं नाही की नुपूर शर्मा एका पॅनेलच्या सदस्याला उत्तर देत होती...
आणि या सर्व संघटनानी सोशल मीडियाचा वापर करून प्रत्येक इस्लामिक देशात ही गोष्ट पसरवली..

५ जूनचा ट्रेंड पाहिल्यास काय चालले होते ते समजेल.
 नूपुर शर्माच्या वक्तव्यावरुन मोदींचा फोटो लावला जात होता.. ट्रेण्ड हे सोशल मीडिया च तापमान तपासण्याचे एक थर्मामीटर आहे..  ज्यात समजते की हवेची दिशा कोणत्या बाजूने आहे..

OIC आपल्यासाठी का महत्वाचे आहे??? आपल्यासाठी तेल आणि वायू तेथून येतात. आमचे लाखो लोक तिथे काम करतात...
अशा स्थितीत काही कमी जास्त झाल्यास त्या गोष्टीचा परिणाम देशावरही होतो.

भारत OIC ला घाबरतो का??? अजिबात नाही.... भारताने गेल्या काही वर्षांत OIC चा स्वतःच्या पद्धतीने सामना केला आहे...
लक्षात ठेवा, राम मंदिर आणि कलम 370 या दोन्ही मुद्द्यावरून इस्लामिक जगतात गदारोळ करण्याचे ठरले होते..पण तसे झाले नाही.

यावेळी वेगळे काय होते.... पैगंबर बद्दलचे वक्तव्य चुकीचे कसे ठरवायचे???
आता तुम्ही म्हणू शकता की शिवलिंगालाही वाईट म्हटले जाते... तर मित्रांनो! ते काम आपल्याच देशातील लोकांनी केले होते..
कोणी अरब देशातले आपल्या न्यूज चॅनलवर बसून शिवलिंगाला कारंजे म्हणून बोलत नव्हते.
आपलेच लोक बोलत होते...
त्यांच्यावर कारवाई न केल्याबद्दल तुम्ही सरकारला शिव्याशाप द्या, किंवा आपल्या राजकीय पक्षाला प्रश्न विचारा.
पण यामुळे इस्लामी देश आपल्या पैगंबराचा अपमान तर  सहन करणार नाहीत ना???

5 जून रोजी बातम्या येऊ लागल्या की अरब देशांमध्ये भारतीय वस्तूंच्या विरोधात निदर्शने सुरू झाली.. काही भारतीय लोकांना कामावरून काढून टाकण्यात आले.. काहींचे पासपोर्ट जप्त करण्यात आले.... आता हे खर की खोटं ...हे माहीत करून घ्यायला वेळ लागेल..
जेव्हा ही बातमी ही बातमी सरकारपर्यंत पोहोचली तेव्हा त्यांनी विचार केला असेल हे प्रकरण वेगळा रंग घेत आहे तर त्या पेक्षा या दोन्ही नेत्यांना निलंबित करून प्रकरण संपवून शकतो अस पक्षाला वाटले असेल.
कारण विनाकारण या मुद्द्यावर इतक्या देशांशी लढून तिथे वसलेल्या भारतीयांना धोक्यात आणून उपयोग नाही.
दुसरे म्हणजे, जर काही मतभिन्नता झाली, गोंधळ वाढला तर आपल्याला तेल आणि वायू पुरवठ्यात फरक पडेल.
कदाचित याचा विचार करून हा निर्णय घेतला असेल.
तसाही पर्यायही नव्हता. तुम्ही याला वाकणे म्हणू शकता..... 56 इंचाला 5.6 इंच म्हणू शकता..
पण या परिस्थितीत अजून काय चांगले झाले असते??

आम्ही या विधाना सोबत आहोत असे भारत सरकारने म्हटले असते तर काय झाले असते???
ही मोहीम मुस्लिम ब्रदरहुड ने चालवली होती...
त्यामुळे साहजिकच त्याला इस्लामिक देशांचा पाठिंबा होता....
त्याच दिवशी दुपारी कतार, इराण, पाकिस्तान आणि नंतर ओआयसीचे पत्रही भारत सरकारला आले होते...
पाकिस्तान कडून आपल्याला घंटा असा काही फरक पडत नाही पण बाकीचे देश आपले सहयोगी मित्र आहेत.
आणि हे सगळं तेव्हा घडत होत जेव्हा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू कतार दौऱ्यावर होते.
मग एक उडत बातमी आली की कतारने आपल्या उपराष्ट्रपतींना डिनर चे आमंत्रण दिले होते ते आता रद्द केले.. जे साफ खोटे होते.

भ्रमक माहिती / misleading information देऊन समोरच्या लोकांची दिशाभूल करणे आणि शत्रूच्या छावणीत फूट पाडणे हे हायब्रीड वॉरफेअरचे सर्वात मोठे शस्त्र आहे.
नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या निलंबनाची बातमी येताच. हिंदूंचा रोष उसळला...सरकारला शिव्याशाप सुरू झाले. कुणी म्हणतंय हे भ्याड सरकार,
पुन्हा मतदान करणार नाही... हे नाही करणार, ते करणार नाहीत.
या मोहिमेचा खरा उद्देश काय असेल याचा कधी विचार केला आहे का???

16 मे 2014 नंतर हे सरकार हटवणे हेच त्यांचे उद्दिष्ट आहे आणि आज आपणच अस बोलून त्यांच काम सोपं करतोय???
या सरकारनंतर जे येतील... ते कोण असतील, काय करतील याचा विचार केला आहे का..?
दुसरीकडे मुस्लिम ब्रदर हुड, ISI, ISPR, IOSPI सारख्या संघटना एकत्र उभ्या आहेत... आणि आपण एक विभाजित घर बनलो आहोत.
एकदा तुम्ही पाकिस्तान, अरब आणि इतर देशांचा सोशल मीडिया ट्रेंड पहा. तुमचेही योगदान दिसतंय तिथे..
हायब्रीड वॉरफेअरचे सौंदर्य हे आहे की यामध्ये तुम्ही चुकीच्या माहितीचे माध्यम केव्हा बनता ते तुम्हालाही कळत नाही.

आज तुम्ही स्वतः तो ट्रेंड चालवत आहात, ज्यासाठी ISPR आणि ISI ला शोधूनही लोक सापडत नव्हते...
तेच काम तुम्ही फुकट करत आहात.
राहिली गोष्ट नुपुरची ती सुरक्षित आहे, ती पूर्वीपेक्षा चांगली आहे... ती लवकरच परत येईल.
प्रश्न पुन्हा तोच आहे....
आपण कधी शिकणार??? की आपण कठपुतळ्यासारखे राहणार ???
कोणत्याही खळबळजनक बातमीवर लगेच प्रतिक्रिया देणं टाळावं... काही तास लिहिलं नाही तर आभाळ कोसळणार नाही..... कोणत्याही घटनेवर प्रतिक्रिया देण्यापूर्वी त्याचा संपूर्ण दृष्टीकोन पाहणं आवश्यक आहे. ... तुम्हाला एका नुपूर शर्माच्या सुरक्षेची चिंता आहे,सरकार त्या देशांत असलेल्या लाखो भारतीयांचा विचार करत आहे जे आखाती देशात आहेत.. उद्या त्यांना काय झाल तर तुम्ही पुन्हा केंद्र सरकारलाच दोष देणार..

माझ्या लेखणीचा किंवा माझ्या प्रतिक्रियेचा शत्रूला फायदा होत असेल तर माहिती मिळेपर्यंत मी लिहिणार नाही किंवा प्रतिक्रिया देणार नाही.

आता या प्रकरणात तुम्ही कोणालाही दोष द्या,सरकारला शिव्या द्या, मतदान न करण्याची शपथ घ्या, NOTA दाबा किंवा भाजपच्या कार्यालयात फोन लावून खडसावा....
 सत्य हे आहे की या युद्धात तुम्ही शत्रूच्या बंदुकांना खांदा देत आहात.

तुम्ही इतके भोळे भाळे आहेत की, तुम्हाला काही दिवसांपूर्वी घडलेल आठवतही नाही.

काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी देशभर रॉकेल शिंपडण्याची भाषा केली होती..
आणि फक्त फक्त माचिसची काडी पेटवायची बाकी आहे, असंही म्हटलं होतं!!
तेही लंडनमध्ये!!
त्यांची सगळी तयारी झाली होती पण ती माचिस ची काडी मोदीजी नी घेतली आणि पाण्यात टाकली.!!

जय हिंद!🇮🇳
जयसिंग मोहन 🚩

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved