Posts

Showing posts from August, 2013

Political Retirement

वयाची एक ठराविक मर्यादा ओलांडली की 'अतिजेष्ठ' नेत्यांना शासकीय कर्मचाऱ्‍यांच्या धर्तीवर राजकारणातून 'सन्मानाने' 'सेवानिवृत्त' करायला हवं...! कारण 'वय झालं' तरीही 'सत्तेची' 'हाव' सुटत नसेल तर डोक्यावर परीणाम होण्याचीच शक्यता जास्त असते... अश्यावेळी नियंत्रण सुटतं आणि हातून वाह्यातपणा घडतो. आयुष्याच्या शेवटाला उगाचच शोभा होते, आणि लोकांकडून फुकटात अख्ख्या जन्माचा उद्धार एका क्षणात होतो...! मनमोहनसिँग आणि एल के आडवाणी -  वरच्या विधानाला साजेशी डोळ्यासमोरची रोजची उदाहरणं...!

Poets

Image
आजपर्यँतच्या निरीक्षणातून सांगतोय... डोळ्याला दिसेल तसं शब्दात बंदिस्त करुन कवी कविता करतो... आणि नंतर पुढची अनेक वर्ष 'अभ्यासक' मंडळी आपल्या डोक्याने त्याचा अर्थ 'लावत' बसतात... तो अर्थ ना कविच्या गावी असतो, ना कवितेच्या... कवि हयात असेल तर काहीतरी अर्थ लागल्याच्या आणि तिच्याआयला आपण असं बनवलंय ( :-O ) च्याआनंदाने हो ला हो... आणि नसेल तर 'अभ्यासकाची' त्यावर पीएचडी तर हमखास ठरलेलीच !!... :-D:-) असो.... :-)

Sky

कुणीही कुणाच्या मोठेपणावर जळू किंवा कुढू नये. कारण प्रत्येकाच्या डोक्यावर प्रत्येकाला स्वत:चे आभाळ मिळालेले असते, आणि त्याखाली तो अनंत मर्यादेपर्यंत मोठा होऊ शकतो. आपण दुसऱ्याचे आभाळ मोजत बसण्यापेक्षा आपल्या डोक्यावरच्या आभाळावर लक्ष्य केंद्रित करावे आणि त्याला गवसणी घालावी. प्रत्येकाला स्वत:च्या डोक्यावर स्वत:च्या मालकीचे आभाळ असल्याने मोठे व्हायची संधी हमखास असते. तीच नेमकी घेतली तर मोठे होणे अवघड नसते.

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved