Sky

कुणीही कुणाच्या मोठेपणावर जळू किंवा कुढू नये. कारण प्रत्येकाच्या डोक्यावर प्रत्येकाला स्वत:चे आभाळ मिळालेले असते, आणि त्याखाली तो अनंत मर्यादेपर्यंत मोठा होऊ शकतो. आपण दुसऱ्याचे आभाळ मोजत बसण्यापेक्षा आपल्या डोक्यावरच्या आभाळावर लक्ष्य केंद्रित करावे आणि त्याला गवसणी घालावी. प्रत्येकाला स्वत:च्या डोक्यावर स्वत:च्या मालकीचे आभाळ असल्याने मोठे व्हायची संधी हमखास असते. तीच नेमकी घेतली तर मोठे होणे अवघड नसते.

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved