लक्ष्मणायण : :
लक्ष्मणायण : : रामायण मुख्यत: रामांचा वनवास, पितृप्रेम, एकपत्नीव्रत सितेची पतीनिष्ठा, त्याग, कौसल्येचं पुत्रप्रेम आणि भरताचं बंधूप्रेम याभोवती गुंफलं गेलंय...!! पण केँद्रस्थानी राम असता लक्ष्मण आणि त्यांचं कुटूंब दुर्देवाने झाकोळलं गेलंय... किँबहूना त्यागाच्या दृष्टीनं त्यांचं कार्य रामांपेक्षाही मोठं आहे. १. लक्ष्मणांनी रामांबरोबर वनवास भोगला. त्यांची सेवा केली. तितकाच त्रास, दु:ख सहन केलं. (यादरम्यान लक्ष्मण तत्वत: एकटेच होते. रामांबरोबर सीता आणि लक्ष्मण होते.) २. कौसल्येप्रमाणे सुमित्रेनेही आपला पुत्र १४ वर्ष दूर ठेवला. परंतू त्या माऊलीचा त्याग कौसल्यांपुढे कां झाकोळला जावा ? ३. लक्ष्मणपत्नी उर्मिला ! एकमेकांपासून १४ वर्ष दूर राहणाऱ्या या दांपत्याच्या प्रेमाने विश्वासाचे एक उदाहरण निर्माण केले. एकपत्नीव्रत राम तसंच एकपत्नीव्रत लक्ष्मण का म्हणू नये ? उर्मिलेचा त्याग सीतांपुढे झाकोळला गेला. त्यांच्या वाट्याला न्याय आलाच नाही. ४. भरतांच्या बंधूप्रेमाचं उदाहरण दिलं जातं. पण त्याचवेळी शत्रुघ्नपण आपल्या सख्ख्या भावाच्या प्रेमापासून वंचित होते याचा साधा उल्लेखही नाही. (लक...