Why Lost RAJ Thakrey ?

राज ठाकरे कां हरले ?
१० मुद्दे
१. वायफळ बडबड :
मी असं करेन, मी तसं करेन यासह भ आणि उ चा यथेच्छ वापर, सभांमधील भाषणात ट्रॅक सुटणारे मुद्दे, उर्मट भाषा यांमुळे सुशिक्षित मतदारांनी नाकारलं.
२. पळकुटेपणा :
"हा राज ठाकरे स्वत: निवडणूकीला उभा राहणार" अशी गर्जना करुन हवा भरली, पण घोडा मैदानात पोहचतात मैदान सोडून पळाले. त्याबद्दल पत्रकारांनी विचारलं तरी चिडायचे.
३. पत्रकारांशी उर्मट वर्तन :
जे पत्रकार प्रसिद्धी देतात त्यांना उद्धटसारखं फटकारणं राज ठाकरेँच्या अंगाशी आलं. आपण खूपच ग्रेट आहोत त्यामुळे कोणालाही फटकारु शकतो या भ्रमात त्यांनी पत्रकारांशी पंगा घेतला आणि त्यामुळे त्यांचा निगेटीव्ह अॅँगल लोकांसमोर आला.
४. उमेदवारांबद्दल गोँधळ :
मतदारसंघात योग्य उमेदवार न देता माहीत नसलेले चेहरे उतरवले. त्यामुळे ८० टक्के लोकांचं डिपॉजिट जप्त व्हायची दुर्देवी वेळ आली. शिवाय उमेदवारांशी भर सभेत उर्मट वर्तन लोकांनी पाहिलंच.
५. नाशिक महापालिका :
नाशिकबद्दल विचारल्यानंतर कधीच योग्य उत्तर देवू शकले नाहीत. पत्रकारांवर खेचकून वेळ मारुन नेण्याची धडपड पकडली गेली. नाशिक मधल्या विकासकामांची योग्य मांडणी करताच आली नाही.
६. मोदीँबद्दल गोँधळलेली भूमिका :
लोकसभेला मोदीँचं नाव वापरुन मतं मागितली, कौतूक केलं. पण विधानसभेला अवघ्या चार महिन्यात त्यांच्या विरुद्ध कॅम्पेनिँग केलं. यात लोकांना दुटप्पीपणा दिसला. मनसे ची नेमकी भूमिकाच स्पष्ट झाली नाही.
७. योग्य मुद्दे नाहीत :
लोकांनी तुम्हाला सत्ता कां द्यावी ? याचं योग्य उत्तर त्यांच्याकडे नव्हतं. ब्ल्यू प्रिँट जरी आली तरी तिच्यातले मुद्दे प्रॅक्टीकल नाहीयेत. शिवाय स्थानिक स्तरावर लोकांना पटेल असे विकासाचे मुद्दे मांडताच आले नाही. किँवा ते मांडण्यापेक्षा इतरांवर टिका करण्यातच त्यांचा वेळ गेला.
८. मराठीचा मुद्दा :
लोकांना विकास हवा आहे. केवळ मराठीच्या मुद्यावर आणि गुजराथी, उत्तर भारतीयांना विरोध करुन निवडणूक जिँकणं अशक्य होतं.
९. जनसंपर्काचा अभाव :
मनसेच्या १२ आमदारांनी पाच वर्षात मतदारसंघात एकदाही मुखदर्शन दिलं नव्हतं. इतर ठिकाणी देखील सेना-भाजपा सारखी नाळ जुळवली नव्हती. मनसे सक्षम पर्याय वाटतच नाय.
१०. ओव्हर कॉन्फीडन्स नडला :
यूती-आघाडी तुटल्याने आमचे साहेबच सीएम अश्या भ्रमात राहीलेल्या कार्यकर्त्याँचा आणि त्यांचा साहेबांचा ओव्हरकॉन्फीडन्स मतदारांनी झिडकारला.

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved