Dasara 2014

दर दसऱ्‍याला प्रधान आजोबांकडे जाणं -
चहा विद मारिगोल्ड कुकीज यांचं सेवन आणि लाखमोलाचे आशिर्वाद घेणं हा माझ्यासाठी अनेक वर्षाँचा ठरलेला पायंडा...
आजची गोष्ट -
चहा विद कुकीज व्हाया महागुरुंच्या नवीन चित्रपटाचं मौखीक समिक्षक असा दसऱ्‍याला साजेशा कार्यक्रम सुरु असतांनाच -
आजोबा -- "तेजस, आज मी तुला खरोखरचं "सोनं" देणारे... खरं सोनं...
(हातातला कप हातात, कुकीच चहात, मी :-O :-O :-O हा अस्सा... खरं सोनं ?? :-O :-O )
आजोबा आजीँना -"अगंsssss... ते घेवून ये..."
आणि हातात भलामोठा बॉक्स घेऊन आज्जी अवतरल्या... मी Shockkk... इतकं ? इतकं ?? आजोबा माझ्यावर इतके का प्रसन्न वगैरे झाले ??
आजोबांनी तो बॉक्स उघडला आणि माझ्याकडे सोपवला.
OMG... wow... yesss... yes !!
त्यात खरंच सोनं होतं... अस्सल... शंभर नंबरी
पु.ल. देशपांडे, आचार्य अत्रे, व.पु., विँदा, कुसुमाग्रज, खांडेकरांची मिळून तब्बल ३२ दुर्मिळ पुस्तकं... आणि पी. सावळाराम, लतादिदी, आशाताई, बाबूजींच्या अप्रतिम गाण्याचं कलेक्शन असलेल्या ७ डिव्हीडी.... :-):-):-):-):-)
हा तर अरबोका खजाना... :-D :-D दसरा पावन झाला... सोन्याची लयलूट झाली :-):-)

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved