. काल रात्री माझ्या एका मित्राची नव्वदीतली आजी देवाघरी गेली. नव्वद वर्षांची होती, शरीर पूर्ण गेलेलं तरीही शेवटच्या क्षणापर्यंत मेंदू आणि वाचा तल्लख होती. तिचा शेवटचा अगदी जीव जायच्या वेळेचा क्षण मला प्रत्यक्ष बघता आला. शेवटचा क्षण कसा असतो, इतक्या वर्षाचं आयुष्य संपत असतं, जे जे माझं माझं म्हणून जमवलं ते इथेच सोडून जायचं असतं, पुढे काय असेल याची एक उत्सुकता अश्या असंख्य भावनांचे काहूर त्यावेळी मनात उठत असावं. त्या आजींच्या शेवटच्या क्षणाचं पूर्ण निरीक्षण केलं. त्यांची वाचा आणि मेंदू शेवटपर्यंत शाबूत होता त्यामुळे नेमक काय होतंय हे जाणून घेण सोप्प झालं. . शेवट जसा जसा जवळ येत होता तसा आजूबाजूंच्या मंडळींची हुरहूर वाढत होती. संपूर्ण शांत आणि भयाण वातावरण. नकळत कुणाच्यातरी मुखातून हुंदका बाहेर पडायचा. आजीं घरभर नजर फिरवत होत्या. त्यांच्या मुलांकडे, मुलींकडे वैगेरे बघत होत्या. खुणेनेच त्यांना शांत व्हा असा इशारा केला. त्यांच्या मोठ्या मुलाने शांतपणे विचारलं, "काही हवंय का आई??" आजी सगळी शक्ती एकवटून "मी खूप थकलीय आणि मला झोप येतेय" इतकंच बोलल्या, आणि समोरच लावलेल्या ...