कालनिर्णय
"भिँतीवSरी... कालनिर्णय असावे."
किँवा
"वामनराव, तुमच्या ठणठणीत तब्येतीचं रहस्य काय ?
- नियमीत व्यायाम, बदामाचा शिरा,
पुरेशी झोप,
व्यसन नाही
आणि कालनिर्णय आरोग्य...
- आता ही कुठली गोळी ?
- गोळी नै ओ, कालनिर्णयची खास आरोग्य आवृत्ती... भिँतीवर लावा आणि शड्डू ठोका...!! हा शिवाजी पार्कातला दोन आजोबांमधला सकाळचा संवाद... कडाक्याच्या थंडीचे दिवस असतांना, डिसेँबरच्या सुरुवातीला पहाटे पहाटे पहील्या चहाबरोबर रेडीओवर ऐकू येणाऱ्या या दोन जाहिराती सकाळी लवकर उठणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग असतात... मला तर माझी स्कूलटाईम मॉर्निँग आठवते... डिसेँबरच्या थंडीत सकाळी स्कूलबस पकडण्यासाठी उठल्यावर डोळ्यावर अलगद झोप, थोडासा संताप आणि ग्लासभर दूध यामागे बॅकग्राऊंड म्यूजिक भिँतीवssरी कालनिर्णय असावे... हेच असायचं... आणि वामनराव... संपायच्या आत दूध संपवायचं...!
.
साधेपणा आणि सुटसुटीतपणा या बळावर गेली बेचाळीस वर्ष कालनिर्णय मराठी घरातल्या आणि मनांतल्या भिँतीवर राज्य करतंय. मराठी माणसाची एकादशी-चतुर्थी सारखी नाजूक नस पकडून कालनिर्णयच्या माध्यमातून जयंत साळगांवकरांनी ८.५ मिली. डॉलर्सचा व्यवसाय उभा केला. मी बघतीलं तसं कालनिर्णयचा लेआऊट, फॉन्ट आणि कलर्स आहे तसंच आहे... कालानुरुप झालेले स्वागतार्ह बदल म्हणजे साहित्य, राशीभविष्य, सीएसटी पासूनचं रेल्वे टाईमटेबल वगैरे. इतर चांगल्या दिसणाऱ्या, गुळगुळीत कागदाच्या दिनदर्शिका खूप आल्यात, पण एकादशी-चतुर्थी वगैरेची खात्री कालनिर्णयमध्ये बघीतल्याशिवाय मिळत नाही हेच त्याचं यश आहे.
.
बाकी, नवीन वर्षाचं कालनिर्णय हातात पडल्यानंतर सगळ्यात आधी काय बघितलं जातं ? - रविवारनं किती पब्लीक हॉलीडेज खाल्ले ?, विकेँडच्या लागून आलेल्या सुट्ट्यांचं प्लानिँग आणि आपला Happy Birthday...
.
आणि, कॅलेन्डर हातात आल्याबरोबरच "चला ! हे वर्ष संपतंय... आता, नवे वर्ष - नवी सुरुवात" ही पॉझिटीव्ह फिलीँग येते ती महत्वाची...! :-):-)