Gurucharitra Parayan

कालपासून गुरुचरीत्राचं पारायण सुरु केलंय. दरवर्षी हे सात दिवस मला खूप शिकवणारे असतात. स्वत:च्या अनेक गोष्टीँवर ताबा ठेवला जातो. 
आणि या सात दिवसात कुठल्याना कुठल्या रुपात दिव्य दृष्टांत मिळतोच.
.
कालच रात्री स्वप्नात मी गाणगापूरात असल्याचं दिसलं. आणि आज सकाळीच आमचे एक नातेवाईक गाणगापूरला गेल्याचा फोन आला. महाराजांनी स्वत:हून सेवा करुन घेतली... कुठल्या ना कुठल्या रुपानं मी तिथे पोहचलोच. आणि आज दुपारी पहिल्यांदाच मनीध्यानी नसतांना अचानकच "देऊळ बंद" चित्रपट बघायला मिळाला. देऊळ बंद चित्रपटात दत्तसंप्रदाय आणि दत्तस्थानांचं अप्रतिम दर्शन दिलंय. आणि महाराजांचं आपल्याकडे कसं लक्ष आहे याचा उत्तम साक्षात्कार दाखवलाय. शहारे येतात अंगावर.
.
अनुभूती कशाला म्हणतात याची "याची देही, याची डोळा" प्रचिती आली... या सात दिवसांत खूप शांत वाटतं, कितीही टेँशन असू देत - सात दिवस महाराज आपल्याबरोबर असल्याचं पदोपदी जाणवतं.

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved