Posts

Showing posts from October, 2017

Diamond Set and Saree

प्रसंग १ : स्थळ : घरी पात्र : मी आणि आई... मी मुंबईहून सकाळीच आलो, चहा घेता घेता - मातोश्रींनी स्वतःच्याच दुकानातून चार - पाच साड्या आणलेल्या. त्यापैकी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुठली नेसायची याचा सल्ला घेणं तिचं सुरु होतं... साड्या वगैरे बाबतीत मला अक्कल नाहीय हे माहीत असुनही माझा सल्ला मागितला याचं विशेष कौतूक वाटत होतं... आलेल्या संधीचा फायदा घेत, उगाच भाव खाण्यासाठी अनुकमे तीन साड्यांवर विस्तृत चर्चा केल्यावर - आणि त्या का नको याचं विशेष वर्णन ऐकून कंटाळलो... मी - तुझी यापैकी कुठली ठरलीय ? मातोश्री : ही ग्रीन कलरची. मी - (मूळ मुद्दा लक्षात आला) "छान आहे ! " कर फायनल ! सेम सिन पप्पा आणि तुषारबरोबरही झाला... . प्रसंग २ : स्थळ : फोन + व्हॉटस्अॅपवर पात्र : मी आणि ती.. (फोनवर) ती : तेजा, मी तुला काही डायमंड सेटस् चे फोटो पाठवतेय. त्यातला छान असेल तो सजेस्ट कर... मी : मला काय कळतंय त्यातलं. जो आवडेल तो घे... ती : सजेस्ट कर म्हणतेय ना तर कर... व्हॉटस्अॅपला तीन फोटो आले. त्यातल्या एकावर कॅप्शन "हा बघ किती छान आहे...." (फोनवर) ती : कुठला छान वाटतोय ? मी

जगजितसिंह

Image
दुःख, विरह हे सुद्धा अनुभवण्याची गोष्ट आहे हे त्यांनी पटवून दिलं... त्यांनी प्रेमात पडलेल्या काळजाची तार छेडली तसंच प्रेमभंगातल्या दुःखातून पाझरणाऱ्या अश्रूंचं गीत केलं... एकीकडे प्रेमाची थंडगार वाऱ्याची झुळूक दाखवली, दुसरीकडे विरहातली हूरहूर ... "सॉंसे देकर अपनी संगीत अमर कर दो"... म्हणत या माणसानं गझल अमर केली... .. संध्याकाळ पासून चढत जाणारी रात्र, थंडगार वारा, मंद प्रकाश - आणि जगजितसिंगांची गझल... हि अनुभवण्याची गोष्ट आहे... "प्यार का पहला खत" पासून सुरुवात करायची, तुम को देखा तो ये खयाल आया, झुकी झुकी सी नजर, सरफरोश मधलं होशवालोको खबर है क्या, तेरी खुशबू मे बसे खत, तुम इतना जो मुस्कूरा रहे हो" ही गाणी करत करत संध्याकाळ संपता संपता - "कही दूर जब दिन ढल जाऐ" वर यायचं... गझल ही नशा आहे... रात्र चढते तशी गझल चढणार... जगजितसिंगांचा गंभीर आवाज - आणि रात्र... हा एकांत हवाहवासा वाटणारा, अनुभवण्यासारखा असतो... चढत्या रात्रीसोबत "होठो से छू लो तूम...." ऐकायचं. कुठलीही गझल एकदाच ऐकून मन भरणार नाही - पून्हा पून्हा ऐकायचं... "होठो से" तर

Guilt for forever

= Guilt for forever = माझी पणजी, माईआजी गेल्या तेव्हा मी ८ - ९ वर्षांचा असेन. त्या गेल्या, पण जन्मभराचा एक अपराध माझा जीव घेतो. दसरा आणि त्यानंतरचा हा दिवस आला की माझं मन सैरभैर होतं, बेचैन होतं. कधीही न भरून निघणारी, प्रायश्चित्त घेता न येणारी हूरहूर दाटते... . माईआजी वर्षभर बेडवरच झोपून होत्या, पण त्यांचं बोलणं व्यवस्थित होतं... दसऱ्यालाही दुपारी १२-१२:३० पर्यंत सगळं चांगलं होतं... दसऱ्याचा दिवस म्हणजे आमच्याकडे नवरात्राचे उपवास संपून कुळधर्म असतो. आईनं माईआजींना सकाळी चहा, नाश्ता दिला... दुपारी १ वाजता त्यांना मी पाणी दिलं... पाणी देतांनाच "भूक लागलीय, जेवायला वाढायला सांग" असं अडखळत बोल्ल्या... त्यांना दुसऱ्या मजल्यावर एका रुम मध्ये ठेवलेलं. तिथून खाली किचनमध्ये आलो... आई त्यांचंच ताट वाढत होती, माईआजींच्या जेवणाकरता आम्ही तेव्हा  सोवळं, नैवेद्य हा विचार करत नव्हतो... त्यांना देणं नेहमीच महत्वाचं होतं... मी आईला सांगणं ते तिचं वाढणं यात पंधरा मिनिटं गेले, त्यांचं ताट घेऊन आई वर आली तोवर माईआजी कोमात गेलेल्या... हाका मारल्या, डॉक्टर्स बोलावले, प्रार्थना केली पण ती घटीका

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved