Diamond Set and Saree
प्रसंग १ :
स्थळ : घरी
पात्र : मी आणि आई...
मी मुंबईहून सकाळीच आलो, चहा घेता घेता -
मातोश्रींनी स्वतःच्याच दुकानातून चार - पाच साड्या आणलेल्या. त्यापैकी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुठली नेसायची याचा सल्ला घेणं तिचं सुरु होतं... साड्या वगैरे बाबतीत मला अक्कल नाहीय हे माहीत असुनही माझा सल्ला मागितला याचं विशेष कौतूक वाटत होतं... आलेल्या संधीचा फायदा घेत, उगाच भाव खाण्यासाठी अनुकमे तीन साड्यांवर विस्तृत चर्चा केल्यावर - आणि त्या का नको याचं विशेष वर्णन ऐकून कंटाळलो...
मी - तुझी यापैकी कुठली ठरलीय ?
मातोश्री : ही ग्रीन कलरची.
मी - (मूळ मुद्दा लक्षात आला) "छान आहे ! " कर फायनल !
सेम सिन पप्पा आणि तुषारबरोबरही झाला...
.
प्रसंग २ :
स्थळ : फोन + व्हॉटस्अॅपवर
पात्र : मी आणि ती..
(फोनवर)
ती : तेजा, मी तुला काही डायमंड सेटस् चे फोटो पाठवतेय. त्यातला छान असेल तो सजेस्ट कर...
मी : मला काय कळतंय त्यातलं. जो आवडेल तो घे...
ती : सजेस्ट कर म्हणतेय ना तर कर...
व्हॉटस्अॅपला तीन फोटो आले. त्यातल्या एकावर कॅप्शन "हा बघ किती छान आहे...."
(फोनवर)
ती : कुठला छान वाटतोय ?
मी : तो एक नंबरचा ...
ती : तो नाही, मी सांगितलेला कसा आहे ? तो सेट खूप आवडलाय मला.
मी : आवडलंय तर मला कां विचारलं ? डिरेक्ट फायनल करायचं ना.
ती : तसं नाही - आधी तू बोल - मला आवडलाय ना त्या सेटलाच की - "हाच सेट खूप छान आहे, हाच घे... मग मी घेते...."
(अगेन : मूळ मुद्दा लक्षात आला )
मी : "हाच सेट खूप छान आहे, हाच घे..."
शिकवलेल्या पोपटासारखं वाक्य पटपट बोललो... आणि "सुटलो" !
..
तात्पर्य : आपली अक्कल न वापरता ठराविक प्रसंगी हो ला हो लावणं जमलं की majjani Life...
..
#दिवाळी #ती_आणि_मी