व्यवसायातले नग 2

कॉलेजमध्ये असतांना एक फुल्ल टू राजकारणात घुसलेलं पोरगं होतं... अभ्यासात मध्यमवर्गीय म्हणावा असा,  प्रत्येक इयर ला एक-दोन वर्ष आराम केलेला... पण एका प्रादेशिक पक्षाचा युवा सरचिटणीस वगैरे. ''साहेबांसोबतचे" फोटो मोठ्या दिमाखात दाखवायचा... त्याला java चा साधा अॅडीशनचा प्रोग्राम जमला नाही, फायनल इयर viva ला exception handling च्या सोप्प्या प्रश्नावर बोंब पाडून आल्यावर बाहेर येवून टोळभैरव जमवून नरेंद्र मोदी या देशाचं कसं वाटोळं करू शकतात यावर त्याने तासभर लेक्चर दिलेलं... त्याला सगळे सोयीनुसार गमतीने-उपहासाने-आदराने भावी आमदार म्हणायचे... आणि आपलं राजकारणात सेट आहे समजून तो नेत्याच्या मागे पुढे असायचा, आंदोलनं - बंद - गाड्या फोडणं वगैरे उत्साहात करायचा...
अगदीच जोश चढला तर या बामणांनी भटांनी देशाची वाट लावली म्हणत हिंडायचा...
..
पुढे कॉलेज संपलं, प्रत्येक जण आपापल्या वाटेने गेला...
आणि तो भावी आमदार विस्मृतीत गेला...
..
काल संध्याकाळी कुठूनतरी नं मिळवून त्याने कॉल केला ...
नांव ऐकून... "बोला आमदार"... पण यावेळी एक दिर्घ हम्म्म्म शिवाय काहीच नव्हतं...
तेजा, तुझ्याकडे ओपनिंग्स आहेत असं कळलं...
माझ्यासाठी बघ रे होतंय कां ? मुंबईतच हवंय...
- अरे पण तू तर xxxचा पदाधिकारी ना ? राजकारणात जाणार होतास ना ?
- हो रे ! पण होत नाहीय... रोजखर्चाला पैसे नाही, साहेबांनी पक्ष बदलला तर सगळेच वांधे झालेय .... विषय सुटत नाहीय तर डिग्री सोडली... आहेत कां जॉब्स ? फक्त वर्षभर हवंय.. मुंबईत नव्या पक्षात ओळखी पण होतील... आणि नेमकी डिग्री नसल्याने दुसऱ्या ठीकाणी जॉब मिळणार नाही... !
..
त्याची अभ्यासात पडलेली बोंब प्रत्यक्ष्य बघितल्याने, त्यातही वाह्यात पक्षाच्या मागे फिरुन त्याच्यातला उपजत बिनडोक स्वभावाला बूस्टर मिळालेलं... अॅडेड : पक्का द्वेषी... पैलवानी भेजा... ऑफीसमध्ये घेतलं आणि डोकं फिरलं तर तोडफोड करायलाही मागे पुढे करणार नाही...
ही ब्याद आपल्याकडे नको ! म्हणून आहे तो बॉल टोलवायचं ठरवलं...
..
"अरे पण माझ्याकडे बॅक ऑफीस करता नाहीय, आणि टेक्नीकलची रिक्रूटमेंट फक्त बीई-एमसीए करता आहे... ते पण strictly मेरीट अॅन्ड स्कील टेस्ट वर...
सो - बेटर इज ... दुसरीकडे ट्राय कर... चल बाय... गुड लक ! "
एका दमात बोलून फोन ठेवला ... !
वाईट वाटलं - पण नाईलाज होता...
xxतं गाढव अंगावर कोण घेईल ?
..
उमेदीच्या काळात हातचं सोडून यझ राजकारणात पडून,
बिनमिशीच्या सांताच्या मागे लागत झेंडे घेऊन दगडफेक, तोडफोड, जाळपोळ केली की महत्वाचं वळण मागे पडतं, आणि पुढे आयुष्याचं गाडं भलत्याच ठिकाणी ठोकलं जातं...
..
काल - परवा दगडफेक करणाऱ्यांतही पुढचे असेच अनेक सो कॉल्ड भावी आमदार असतील... !
Karma works !!

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved