BJP 38th Anniversary
भाजपा
१९५१ मध्ये हिंदूत्व विचारधारेच्या जनसंघाची श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी स्थापना केली. १९७७ मध्ये भारतीय इतिहासाचा काळा कालखंड आणीबाणी संपल्यानंतर झालेल्या निवडणूकांत जनसंघाला कॉंग्रेसला हरवण्यात यश मिळालं, इंदिरा गांधींना मोठ्ठा धक्का बसला. आणि ६ एप्रिल १९८० रोजी जनसंघासह सहविचारी पक्षांचं एकत्रीकरण होवून वाजपेयींनी भारतीय जनता पक्ष स्थापन झाला... भारतीय राजकारणाचा आणि उत्कर्षाचा सुर्योदय म्हणावा असा दिवस.
..
हिंदुत्ववादी विचारधारा, राष्ट्र-हिंदूत्व-तत्व यांवर एकनिष्ठ असणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांची फळी आणि रा. स्व. संघाचा पाया यावर भाजपाची वाटचाल सुरु झाली... सुरुवात तशी अडखळत झाली. १९८४ लोकसभेला फक्त २ सिटस् आले... नरेंद्र मोदींनी एका कार्यक्रमात किस्सा सांगितला... तेव्हा उभ्या उमेदवारांपैकी ४ लोकांचं डिपॉजिट वाचलं हेच मोठ्ठं यश समजून त्यांनी सेलिब्रेट केलं होतं... १९९८ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार स्थापन झालं, ते वर्षभर चाललं - परत निवडणूका होवून पुर्ण बहुमतात सरकार आलं. त्या सरकारने कार्यकाळ पुर्ण केला... ! २००४ ते २०१४ या काळात वनवास भोगल्यानंतर भाजपाला नरेंद्र मोदी नावाची शक्ती गवसली आणि त्या शक्तीने न भूतो न भविष्यती अश्या उंचीवर भाजपाला नेलं..
..
राष्ट्रवाद, राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही, समाजवाद, सकारात्मक सेक्युलॅरिझम अर्थात 'सर्व धर्म समभाव' आणि मूल्याधिष्ठित राजकारण करण्यासाठी भाजपा कटिबद्ध आहे. हिंदुत्व, राष्ट्रीयत्व, समान नागरीकत्व या विचारधारेवर भाजपाचं कमळ फुलतंय... भाजपाच्या प्रत्येक मूळ कार्यकर्त्यात राष्ट्रभक्ती जागृत आहे.
..
भाजपाच्या पक्षकार्यालयात लोकशाहीची मूल्य रुजलेली दिसतील. तुम्ही पक्षात लहान कार्यकर्ते असाल तरीही तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकाल... राष्ट्रीय अध्यक्षही सामान्य कार्यकर्ता आधी असतो... इथे मोठं होण्यासाठी कुणाचीही तळी उचलावी लागत नाही... ना कुणाचे पाय धुवावे लागतात... तुमचा प्रामाणिकपणा आणि निष्ठा यांचीच कसोटी असते... !
..
भाजपा हे एकत्र कुटूंब आहे, एक प्रामाणिक विचारधारा आहे... भाजपा हा संस्कार आहे... भाजपाचा खरा कार्यकर्ता त्या विचारधारेचा पाईक आहे... प्रत्येकजण घडतोय... अनेक राष्ट्रपुरुष, राष्ट्रऋषी या पक्षात घडले... ज्यांनी या राष्ट्रासाठी आपलं आयुष्य वेचलंय.. पं. दिनदयाल उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी पाया रचला... भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांनी भिंती उभारल्या... आणि नितीन गडकरी, सुषमा स्वराज, प्रकाश जावडेकर , वेंकय्या नायडू, अमित शाह, प्रमोदजी महाजन, राजनाथसिंहजी या धुरीणांनी त्यावर कळस चढवला... हा रथ करोडो कार्यकर्ते निष्ठेने ओढताय... !
..
"भाजपा" ची स्थापना झाल्यावर अटलजींनी घोषणा केली -
अंधेरा निकलेगा, सुरज निकलेगा, कमल खिलेगा ... !
आणि कमळ फुललंय... !
२ खासदारांवरुन सुरुवात केलेला पण आता ३३० खासदारांसह देशभराच्या विधानसभांत सत्ताधीश हा हिंदुत्ववादी पक्ष आहे.. !
..
भाजपात काम करतांना संस्कार होतात...
माणूस घडतो..
भाजपाच्या भल्या मोठ्या कुटूंबाचा सदस्य असल्याचा अभिमान आहे तो यामूळेच !
भाजपाच्या प्रत्येक निष्ठावान सदस्याला आजच्या दिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...
सभ्यता आणि संस्कारांसह पक्ष वाढवू... कमळ फुलवू !
- तेजस कुळकर्णी
(भाजपाचा समर्थक, कार्यकर्ता आणि सदस्य)