Angry Cab Driver and Salmaan Khan

वर्षभरापूर्वी दिवाळी/ईद/सलमानची केस हिअरींग असं काहीतरी होतं, काय ते नेमकं आठवत नाही, पण मुंबईत सलमान खानच्या गॅलक्सी समोर गर्दी होती... इतकी मरणाची गर्दी की तिथून गाड्या वगैरे निघणंही शक्य होत नव्हतं... बाऊन्सर्स, पोलीस तैनात होते...  मी कॅबमध्ये होतो... गर्दीला वैतागल्याने कॅब ड्रायव्हरच्या तोंडाचा पट्टा सुरु झाला... बोंबलतच तो गर्दीत गाडी घुसवत होता...
कामधंदा छोडके ये xx चले आते है बुढ्ढेको देखने... येडेकी पूँछ वगैरे शाब्दिक पाऊस पाडत होता, तेवढ्यात गॅलक्सीचं गेट उघडून (मे बी) सलमानखानची गाडी बाहेर आली, गर्दी एकदम एक्टीव्ह झाली आणि त्या धुंदीत पळणारे दोन पोरं एकदम आमच्या गाडीसमोर आले.. ड्रायवरने अर्जंट ब्रेक लावून गाडी थांबवली... आणि,
xके, मरना है क्या नीचे आके ?
मै शर्ट निकालता हूँ मुझे देख मुँह फाडके, उस बुढेको देखता है तो - म्हणत घाण शिव्या घालतच गाडी काढली...
..तिथून ड्रॉपपॉइंट येईपर्यंत पाऊणतास त्या ड्रायव्हरने सलमान, शाहरुक, तैमूरपिता, नुकताच सुटून आलेला संजय दत्त यांना तोंडाला येतील त्या शिव्या घातल्या...
त्या संतापाचा गाभा होता..
"कमीने देश को खुद के बापका माल समझते है ... खरीदके रखा है हरामजादोने कानूनको.. "..
.
आज सकाळपासून बातम्या बघतांना तो कॅब ड्रायव्हर आठवला..
मनापासून सुखावला असेल तो आज !

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved