अटल बिहारी वाजपेयी Atal Bihari Vajpeyi
दि. २८ मे १९९६, संसदेत एक ऐतिहासिक क्षण साजरा होणार होता... संसदेच्या आजपर्यंतच्या इतिहासातली एक महत्वपूर्व घटना घडणार होती... सभापती होते पी. ए. संगम्मा. अनेक पक्षांचा टेकू घेऊन निर्माण झालेल्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला बहूमत सिद्ध करायचं होतं, ऐनवेळी धोका झाला - आणि बहूमत नसल्याचे जाणून वाजपेयींनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला... पण तत्पूर्वी त्यांच्यावर घोडेबाजाराचा आरोप केलेल्या काँग्रेस सरकारची संसदेतच पुराव्यासकट न भूतो न भविष्यती अशी पिसं काढून "मै यहाँसे सिधा राष्ट्रपती महोदयके पास अपना इस्तिफा सौंपने जा रहा हूँ".... म्हणत निघाले देखील ! कॉंग्रेस सरकारला तेव्हा बसलेला धक्का इतका जबरदस्त होता, पुढची आठ वर्ष ते त्यातून सावरले नाहीत ... केवळ तेरा दिवसांचं वाजपेयी सरकार पडलं - सुर्यास्त वाटला - पण प्रत्यक्ष्यात ते ढग होते, ते हटले आणि भाजपाचा लख्खं प्रकाश पडला... या रथाचे सारथी होते अटल बिहारी वाजपेयीजी... ! .. १९९८-१९९९ तेव्हा मी पाच-सहा वर्षांचा होतो... थोडीफार समज आली, तेव्हा हा देश आहे, यासाठी कुणी एक पंतप्रधान असतात, ज्यांचे फोटो...