Vote India Vote
मतदान करा "च" ! लोकसभेची निवडणूक रोज रोज येत नाही. १०० वर्ष जगलो तर आपल्या उभ्या आयुष्यात जास्तीत जास्त १६ - १७ लोकसभा येतात. त्यात मतदानाला जाणं - मतदानाची प्रक्रीया करणं - परत येणं, यात अर्धा ते पाऊण तास, खुप झालं तर १ तास जातो. दर ५ वर्षातला हा १ तास आपण देशाचा पंतप्रधान असतो, राजा असतो. पुढच्या पाच वर्षासाठी देशाचं धोरण आपण ठरवत असतो. अनेक योजना, महत्वाचे कायदे पास करत असतो. देशाचा विकास करत असतो. म्हणजे पुर्ण आयुष्यात जास्तित जास्त फक्त १७ तास आपल्याला ही संधी मिळते. उद्याचा दिवस तसाच... राजा असण्याचा. पंतप्रधान असण्याचा. मतदान करा ! हक्क आहे आपला, तो मिळवा. पुढच्या पाच वर्षात देश जी काही प्रगती करेल तिचे आपण बरोबरीचे शिल्पकार असू, जबाबदार असू...! त्यामूळे मतदान करा.... कराच ! उद्याचा दिवस पंतप्रधान व्हा ! राजा व्हा ! - तेजस कुळकर्णी ... मतदानाची आजची पूर्वतयारी : .. १. आपलं मतदान कुठल्या केंद्रावर आहे याची खात्री करा. यासाठी https:://www.nvsp.in या संकेतस्थळावर किंवा Voter Helpline App वर मार्गदर्शन मिळेल. त्यावरून ...