Vote India Vote

मतदान करा "च" ! 
लोकसभेची निवडणूक रोज रोज येत नाही.
१०० वर्ष जगलो तर आपल्या उभ्या आयुष्यात जास्तीत जास्त १६ - १७ लोकसभा येतात. त्यात मतदानाला जाणं - मतदानाची प्रक्रीया करणं - परत येणं, यात अर्धा ते पाऊण तास, खुप झालं तर १ तास जातो.
दर ५ वर्षातला हा १ तास आपण देशाचा पंतप्रधान असतो, राजा असतो. पुढच्या पाच वर्षासाठी देशाचं धोरण आपण ठरवत असतो. अनेक योजना, महत्वाचे कायदे पास करत असतो. देशाचा विकास करत असतो.
म्हणजे पुर्ण आयुष्यात जास्तित जास्त फक्त १७ तास आपल्याला ही संधी मिळते.
उद्याचा दिवस तसाच... राजा असण्याचा. पंतप्रधान असण्याचा.
मतदान करा ! 
हक्क आहे आपला, तो मिळवा.
पुढच्या पाच वर्षात देश जी काही प्रगती करेल तिचे आपण बरोबरीचे शिल्पकार असू, जबाबदार असू...!
त्यामूळे मतदान करा....
कराच ! 
उद्याचा दिवस पंतप्रधान व्हा ! 
राजा व्हा !
- तेजस कुळकर्णी 
...
मतदानाची आजची पूर्वतयारी :
..
१. आपलं मतदान कुठल्या केंद्रावर आहे याची खात्री करा. यासाठी https:://www.nvsp.in या संकेतस्थळावर किंवा Voter Helpline App वर मार्गदर्शन मिळेल. त्यावरून आपला यादी भाग क्रमांक, आणि त्यातील अनुक्रमांक लिहून घ्या. केंद्रावर गेल्यानंतर सोप्पं होतं.
..
२. मतदानासाठी पुढीलपैकी कुठलंही एक ओळखपत्र "ओरीजीनल" सोबत बाळगा. आधार कार्ड / ड्राइविंग लायसन्सची फोटोकॉपी नाकारु शकतात. मतदार कार्ड असल्यास खुप चांगलं. डॉक्युमेंट यादी :
मतदार ओळख कार्ड, आधार कार्ड, ड्राईविंग लाईसन्स, राष्ट्रीयकृत बँक किंवा पोस्ट यांचं पासबूक, पासपोर्ट, पॅन कार्ड, सर्विस आयडी कार्ड इ. बाकी मनरेगा कार्ड वगैरे आहेत. पण वरील सर्व जवळपास प्रत्येकाकडे असतातच.
.
३. आपलं मत कोणत्या उमेदवाराला द्यायचं याची निश्चिती आजच करुन ठेवा. उद्यापर्यंत पेड न्यूज, ट्रेंडस् बिल्डअप मध्ये अनेक प्रकारे आपल्या मतावर परिणाम करणाऱ्या गोष्टी समोर येवू शकतात. त्यामूळे आपल्या मताचा निर्णय करुन ठेवणं महत्वाचं आहे.
..
उद्या मतदानावेळी :
१. मतदान सकाळी ७ ते सायं. ६ पर्यंत अखंड सुरु असणार. त्यात लंच टाईम वगैरे नसतो. वेळेत केव्हाही जा. उत्साहात स्वागत होईल.
.
२. मतदान केंद्रावर मोबाईल किंवा तत्सम इलेक्ट्रॉनिक गॅजेटस् नेण्यास मनाई आहे. सेल्फी घरी आल्यानंतर काढावा लागेल. 
.
३. मतदानाचं बटन दाबल्यानंतर सात सेकंदांसाठी व्हिटीपॅट मशिनच्या डिस्प्लेवर आपण मत दिलेल्या उमेदवाराचे डिटेल्स दिसतात. नंतर चिठ्ठी आपोआप मतपेटी मध्ये पडते. ते योग्य नसतील म्हणजे मतदान एकाला, चिठ्ठीत भलतंच नाव आलं तर लगेच तेथील आधिकाऱ्यांच्या लक्षात आणून द्या. जर खरंच तसं होत असेल तरंच सांगा. गंमत म्हणून किंवा टिव्हीवर झळकायला मिळेल म्हणून करायला गेलात तर कमीतकमी दहा हजाराला पडेल आणि महिनाभराची जेलयात्रा घडेल.
.
४. एका पक्षाचं बटन दाबलं तरीही दुसऱ्या पक्षाला मत जातं असं होत नाही. कुणी काहीही बोललं तरीही खरंच असं होतं कां हे बघण्यासाठी भलतंच बटन दाबून येवू नका. नसता घोटाळा व्हायचा.
.
५. उद्या मतदानाला जातांना कुठल्याही पक्षाचं अधिकृत चिन्ह असेल असा कागद, बोर्ड, ब्रोच, गाडीवरचा लोगो वगैरे नेवू नका. ते आचारसंहिता भंग ठरू शकतं. गुन्हा असतो तो. 
...
वेळात वेळ काढून मतदान करा...!
- तेजस कुळकर्णी 

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved