जे होतं ते चांगल्यासाठीच होतं !
''जे होतं ते चांगल्यासाठीच होतं -"
गेल्या सात महिन्यांपूर्वी माझ्या कंपनीसाठी यूएसएचा एक मोठा चेन प्रोजेक्ट आम्ही मिळवला. ज्याचं एकुण कॉस्ट माझ्या कंपनीच्या अॅन्यूअल टर्नओव्हरच्या दहापट आहे... त्यात आम्ही पाच कंपनीज् आहोत, आणि माझ्याकडे तिसऱ्या स्टेपचं काम होणार. म्हणजे दुसऱ्या स्टेपचं काम झालं की ती कंपनी माझ्याकडे देणार, मी त्यात माझं काम करुन चौथ्या स्टेपच्या कंपनीकडे पाठवणार... जे काम मी करणार ते त्या प्रोजेक्टचा ४० टक्के भाग आहे...!
..
माझ्या कंपनीला प्रोजेक्ट मिळाला, अॅग्रीमेंट झालं, एडवान्स मिळालं आणि आम्ही प्लानिंग केलं... त्या प्रोजेक्टसाठी एक मोठी सिस्टिम उभारणं, मशीन्स घेणं, तितकाच मोठा स्टाफ घेणं, आणि माझं आत्ताचं वर्कप्लेस त्यासाठी कमी पडणार म्हणून मोठं वर्कप्लेस घेणं आवश्यक होतं. त्यामूळे ऑफीसच्या जवळच मी नवं वर्कप्लेस बघितलं... मोठी सिस्टीम उभारण्यासाठी पुरेसा पैसा उभा करणंही गरजेचं होतं... म्हणून मी काही शेअर्स, इतर प्रोजेक्टचं च्या पेमेंटमधून आणि बिजनेस लोन करता अप्लाय केलं.
..
१५ नोव्हेंबर २०१८ ला पहिलं असाईनमेंट येणार असं अपेक्षित होतं. त्यामुळे मी सगळी तयारी १ सप्टेंबरलाच सुरु केली. माझे इतर पेमेंटस् नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात येणार होते. त्यामुळे मी निश्चिंत होतो. मी बिजनेस लोन करता प्रोसेस स्टार्ट केली... त्यासाठी आवश्यक डॉक्युमेंटस् जमवतांनाच ऐन आरओसीच्या दरम्यान माझ्या कंपनीच्या सीएचं निधन झालं... आणि अडकलं...! आरओसी अडकल्याने बिजनेस लोनही अडकलं... भरीस भर म्हणून ज्या एका प्रोजेक्टच्या पेमेंटवर मी पहिल्या काही ओव्हर्स खेळणार होतो त्यांनीही साठ दिवसांचं एक्स्टेंशन मागितलं. पूरताच अडकलो. नवं वर्कप्लेस, स्टाफ, मशिन्स वगैरे तयारी मी सुरु केलेली, ते आता मोठे मोठे डोंगर दिसायला लागले.
..
साधारण १५ नोव्हेंबरच्या दरम्यान अजून एक गोष्ट झाली, ते म्हणजे स्टेप २ जी कंपनी करणार होती त्यांना काही टेक्नीकल एरर मूळे आणि क्लायंटनी प्रॉडक्ट क्वांटीटी वाढवल्याने प्रोजेक्ट ड्युरेशन वाढवावं लागलं. एकीकडे पेमेंटस् अडकले, दुसरीकडे प्रोजेक्टचं टेंशन वाढलं ... प्रोजेक्ट हातात पडला की शेअर्समधून पैसे काढू म्हणून मी शेअर्सही टर्म होल्डींगवर ठेवले.
..
पेमेंटस् अडकलेले - त्यामूळे सिस्टिम उभारू शकत नाही,
आणि त्यात महत्वाचं टेंशन म्हणजे आज जर तो प्रोजेक्ट हातात मिळाला तर करु काय ? कारण काऊंटडाऊन लगेच स्टार्ट होतं... त्यात आरओसी करता नवीन सीए शोधून, आधीच्या सीए कडून सगळे डॉक्यूमेंटस् घेणं आणि पेनल्टी भरून कां होईना पण ते मार्गी लावणंही डोक्यावर होतं... या गडबडीत आर्थिक चणचण भासायला लागली. पैसा हातात असून वापरता येत नव्हता... कन्सल्टन्सीच्या पेमेंट टर्म ९० दिवस ते १५० दिवस अश्या असतात, त्यामूळे ऑगस्ट ते डिसेंबरचं पेमेंटही मार्च-एप्रिल २०१९ ला मिळणार होतं... व्यवसाय करतांना पहिल्यांदा कंपनीला पुरवावं लागतं नंतर स्वतःला... त्यामूळे धडपड होत होती... ! दिसायला पैसा खूप दिसायचा, पण तो काचेच्या खोलीत - ज्याची किल्ली लागत नव्हती...! डोक्यावर प्रोजेक्टस् , टिकेसीएस च्या रिक्वायरमेंटस् होत्या. भरीस भर डिसेंबरमध्ये चुलत बहिणीचं, आणि फेब्रुवारीत सख्ख्या लहान भावाचं लग्न. त्यामूळे एकीकडे ऑफीसचं ओझं, दुसरीकडे घरातल्या कार्याच्या जबाबदाऱ्या -
यात माझी आणि बायकोचीही धावपळ होती, टेंशन्स होते, खर्च होते.
..
मार्च एंड पर्यंत हे ओझं वागवलं...
आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सगळे टेक्नीकल फॉल्टस् दुर झाले... सगळं पेमेंट मोकळं होण्याच्या मार्गावर आहे... त्यात टिकेसीएसचंही पेमेंट मिळतंय. आता तो प्रोजेक्ट सुरु झाला की पुढची दोन वर्षही सहज पास होतील अशी जास्त सोय झालीय. आज स्टेप 2 च्या कंपनीने "बी रेडी फॉर १ मे" असं एक महिना आधीची नोटीस केलीय. म्हणजे १ मे ला तो प्रोजेक्ट सुरु होणार...!
..
यात झालं काय ?
तर पेमेंट अडकलं, आणि प्रोजेक्ट उशीरा मिळाला.
माझ्या कंपनीचा २०१७ - २०१८ चा एकुण टर्नओव्हर जो होता, तितकं त्या प्रोजेक्टचं माझ्या स्टेपवर तीन महिन्याचं प्रॉडक्शन कॉस्ट आहे...
प्रोजेक्ट वाढता आहे, त्यामूळे उशीर होणार हे अपेक्षित होतं,
पण जर तेव्हा पैसे सहज मिळाले असते / अडकले नसते तर, मी सप्टेंबर २०१८ ला तेव्हाच्या असाईनमेंट नूसार वर्कप्लेस, स्टाफ, मशिन्स वगैरे सिस्टिम उभी करुन ठेवली असती. आणि प्रोजेक्ट मे २०१९ ला मिळतोय, त्यामूळे तब्बल ८ महिने माझे रिसोर्स वाया गेले असते...
प्रोजेक्ट वेळेवर सुरु झाला असता, तर ऑक्टोंबरमध्ये जे आर्थिक आणि सीए गेल्याने तांत्रिक टेंशन आलं त्यात निभावणं कठीण गेलं असतं...
जर दोन्ही गोष्टी साध्य झाल्या असत्या तर ऐनवेळी साईज वाढल्याने तारांबळ उडाली असती...
शिवाय सख्ख्या भावाच्या लग्नात काहीही न करु शकल्याची खंत आयुष्यभर असती.
शिवाय नवा संसार, घर, जबाबदाऱ्यांनाही वेळ देता आला.
कंपनी वाढली.
..
हा लाँग टर्म प्रोजेक्ट आहे.
८ महिन्यांत स्टेप २ कडून येणाऱ्या अपडेट्स नुसार माझ्या टिमने त्या प्रोजेक्टचा पहिला कंपोनंट डेडलाईनच्या ३ महिने आधी देता येईल अशी तयारी केलीय... ज्यामूळे माझ्या कंपनीची प्रॉडक्टीविटी वाढतेय.
..
देवाक काळजी...
थोडा त्रास झाला, पण शेवट गोड होतोय.
कठीण काळ होता, पण एक शक्ती असते जी आपल्या चांगल्यासाठीच काम करते...!
जे होतं ते चांगल्यासाठीच होतं - म्हणून चांगलं होईपर्यंत होप्स न सोडणं हा धडा या ८ महिन्यांनी दिला. !
चांगलंच होतं !