BJP

भाजपाचा आज ३८ वा वर्धापनदिन.
..
६ एप्रिल १९८० रोजी हिंदुराष्ट्र, राष्ट्रवाद, आर्थिक उदात्तीकरण आणि मानवता या विचारधारेवर भाजपाची स्थापना झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिस्त, हिंदुत्वाचा पाया आणि राष्ट्रभक्त उजव्या विचारसरणीचे ऋषीतूल्य नेते हे भाजपाचे आधारस्तंभ आहेत. केवळ ३ जागांपासून सुरुवात झालेला भाजपा आज देशातला सर्वसत्ताधीश पक्ष आहे. भाजपा जगातील सर्वात मोठे राजकीय संघटन आहे.
..
१९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी ह्यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली. जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. काँग्रेस व तत्कालीन पंतप्रधानजवाहरलाल नेहरू ह्यांच्या कडून पाकिस्तानचे होणारे लांगुलचालन रोखणे व भारतामधील हिंदूंचे हित जपणे ही जनस्ंघाची उद्दिष्टे होती. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये संपूर्ण सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका जनसंघाने घेतली व ह्यादरम्यान निदर्शने करताना अटक झालेल्या मुखर्जी ह्यांचे तुरुंगातच निधन झाले. दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी ह्या तरूण नेत्यांनी जनसंघाची सुत्रे हातात घेतली. १९५२ सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनसंघाला केवळ ३ जागांवर विजय मिळाला.  १९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात डांबले गेले. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. जयप्रकाश नारायण,मोरारजी देसाई इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पंतप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री बनले. जनता पार्टीच्या विघटनानंतर भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. भाजपचा चेहरामोहरा जनसंघासारखाच होता. या पक्षाची सुरुवात अडखळत झाली. १९८४ च्या सार्वत्रिक निवडणूकांत केवळ २ जागांवर विजय मिळाला.
.
राम जन्मभूमी आंदोलनाने भाजपाला उभारी मिळाली. अनेक विधानसभा जिंकून १९९६ च्या लोकसभेत सर्वात जास्त जागा जिंकून भाजपाने सरकार स्थापन केलं, पण ते केवळ १३ दिवस टिकलं. १९९८ मध्ये एनडीए ने अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन केलं. ज्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला. २००४ ते २०१४ या काळात भाजपाला पराभव पहावा लागला. पण २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकांत मात्र पक्षाने न भूतो न भविष्यती अशी उभारी घेतली. त्या विजयाचे शिल्पकार म्हणजे नरेंद्र मोदी.
..
भाजपा हा लोकशाही मानणारा पक्ष आहे. कुठल्या एका घराण्याची इथे सत्ता नाही. तळागाळातला कार्यकर्ता ते पक्षाचे राष्ट्राध्यक्ष समान असतात. लहानातल्या लहान कार्यकर्त्यालाही राष्ट्रीय अध्यक्ष होता येतं. कुठलाही सदस्य जास्तीत जास्त सहा वर्ष अध्यक्षपदी राहू शकतो. इथे प्रांतभेद, धर्मभेद यांना स्थान नाही. राष्ट्राप्रती समर्पण, पक्षनिष्ठा यांवर भाजपातील कार्यकर्ते श्रद्धा ठेवतात.
..
पं. दिनदयाळ उपाध्याय, शामाप्रसाद मुखर्जी, अटल बिहारी वाजपेयीजी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन, कुशाभाऊ ठाकरे, यांसारखे जेष्ठ नेते भाजपाचे आधारस्तंभ आहेत. भाजपाच्या संस्कारात अनेक रत्न निर्माण झालीत. नरेंद्र मोदी, नितीत गडकरी, वैकय्या नायडू, सुषमा स्वराज, मनोहर पर्रिकर, प्रमोद महाजन, राजनाथ सिंग, अमित शाह, शिवराज सिंह चौहान, शहनवाज हुसैन, किरीट सोमय्या, फडणवीस, प्रकाश जावडेकर, अशी अनेक नावे घेता येतात. ही माणसं तत्वांनी राहतात, वाढतात आणि राष्ट्र पुढे नेतात.
..
भाजपा एकनिष्ठता शिकवते,
भाजपा लोकशाही रुजवते. 
भाजपात वावरतांना राष्ट्रासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळते. 
रास्वसं मातृसंस्था असलेल्या भाजपाने अनेक पराभव पचवले, पण पक्ष म्हणून कधीही ढासळले नाही की तत्वांची वाट सोडली नाही. यांमूळेच शून्यातून उभारी घेत भाजपाने इतिहास घडवला. संघाचे हे संस्कार आहेत. "सत्य परेशान हो सकता है, पराजित नही..." हे भाजपाचे बळ आहे.
..
"कमळ" या पवित्र चिन्हावर भाजपाची राष्ट्र सशक्तीकरणासाठी वाटचाल सुरू आहे. "भाजपा"चा सदस्य असल्याचा अभिमान आहेच, पण भाजपा-रास्वसं यांच्या संस्कारात, चांगल्या लोकांत आपण आहोत याची जाणिव देखील आहे.
- तेजस कुळकर्णी

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved