Posts

Showing posts from June, 2019

औपचारिकता

घरातल्या घरात औपचारिकता ठेवणाऱ्‍यांची मला अति किळस येते... . टेबलवर जेवायला बसले कि भाषण ठोकून चियर्स न बियर्स, चुलत आते मामे मावस भावंड एकत्र आले की डान्स बसवणार, ड्रामा प्ले करणार - घरी वर्षभरातनं भेटल्यावर गेट टू गेदरला गेम्स, गाणी प्लान करणार... लग्नातल्या स्टेजवर गाणी, कविता, डान्स वगैरे करणार... ... किँवा घरातल्या घरात योजना राबवणार, नवरा बायकोला मॅडम बायको नवऱ्‍याला सर म्हणणार, पोरांना घरातल्या घरातल्या नियम-बियम देणार - . मी अश्या कार्यक्रमांना आणि अश्या लोकांकडे जाणं टाळतो. घुसमट होते. . घरात घरासारखंच रहावं. घरी सुद्धा औपचारिकता ठेवावी लागली तर ते घर कसलं - ते तर डोँबल ! गेट टू गेदरला मस्त गप्पा कराव्या, खावं, मस्ती करावी... . अशी एखादी जागा तर ठेवा गड्याहो जिथे हातपाय पसरुन मनासारखं बसता येईल.

प्रिय एबीपी माझा,

प्रिय एबीपी माझा, व्यवसाय चालवतांना जर चुकूनही आपल्याकडून माती खाल्ली गेली, आणि एंड यूजर दुखावला गेला तर त्याच्यापुढे नाक घासून, प्रसंगी डोकं फोडून माफी मागावी... पण एकुण मामला शक्य तेवढा लवकर थंड करावा... तेच फायद्याचं ठरतं... . कारण जर प्रकरण एका लिमिटबाहेर गेलं तर त्याचा परिणाम आपल्या व्यवसायाचा प्राणवायू - म्हणजे पैसा तुटण्यावर होतो. आणि याचा शेवट व्यवसायासाठी खुप वाईट असतो... . एबीपी माझा इथेच चुकतंय. टायटल चुकलं किँवा कार्यक्रम चुकला - मान्य...! बोस्टन हाऊसमध्ये हाडामासाची माणसंच काम करतात. चुक होते ! . पण ट्विटर, फेसबूक आणि त्यांच्या ऑफीसला येणाऱ्‍या मेल्स, पत्र यांतून महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी (जे एंड यूजर्स आहेत) बिनशर्त माफी मागण्याची मागणी केली... जी प्रेक्षकांच्या दृष्टीने योग्य आहे - ती एबीपीने सातत्याने फाट्यावर मारली, ही घोडचूक ठरतेय... एबीपी माझा जरी स्वतंत्र चॅनेल असलं तरीही कार्यक्रम बघणारे प्रेक्षक आहेत, त्यांच्या संख्येनूसार जाहिराती देणारे जाहिरातदार आहेत... आणि एका चुकीमूळे प्रेक्षकांचा एक पुर्ण वर्ग जर दुरावत असेल तर व्यवसायासाठी ती धोक्याची घंटा आहे. . या प...

पु. ल.

१२ जून २००० पु. ल. या देवाचं अवतारकार्य संपला तो दिवस...! . शोधीसी मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी... त्याला पु. ल. तरी अपवाद कसे ठरतील...? पुलं तुम्हाला पुण्यात रुपालीच्या पहील्या मजल्यावर तर शोधूनही सापडणार नाहीत... पु.ल. त्यांच्या पुस्तकांची पारायणं करुनही भेटणार नाही... हा देव तुम्हाला अवतीभवती मात्र चराचरात दिसेल... . दातांच्या जागी छापखान्यातले खिळे बसवलेला आणि जिभेवर साक्षात सरस्वतीने मराठी भाषेचे क्लासेस उघडलेय अश्या सखाराम गटणेच्या रुपात... उघड्या तोँडाच्या पण तितक्याच प्रेमळ माणसांच्या अंतू बर्व्याच्या रुपात... सोसायटीच्या मिटीँग्समध्ये... मराठी शाळाशाळांत तर असंख्य चितळे मास्तर भेटतील... रावसाहेब तर गल्लीगल्लीत - घराघरात, घर म्हणून अख्खं गाव दाखवणाऱ्‍यांत पुलंची अनेक पात्र भेटतात... पोष्टातल्या काऊंटरमागच्या माणसाच्या टक्कलावर केस आले की आज सुद्धा मराठी माणूस त्याची बदली झाल्याचं लगेच ओळखतो... पहीली परदेशवारी आठवून बघा... पुलंना मिळाले तेच सल्ले आपल्यालाही मिळतात... लग्नकार्यात येणारा नारायण हल्ली कुणाच्या मयतालाही दिसतो... . तुम्ही मुंबईत विरारला राहतांना अ...

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved