औपचारिकता

घरातल्या घरात औपचारिकता ठेवणाऱ्‍यांची मला अति किळस येते...
.
टेबलवर जेवायला बसले कि भाषण ठोकून चियर्स न बियर्स,
चुलत आते मामे मावस भावंड एकत्र आले की डान्स बसवणार, ड्रामा प्ले करणार -
घरी वर्षभरातनं भेटल्यावर गेट टू गेदरला गेम्स, गाणी प्लान करणार...
लग्नातल्या स्टेजवर गाणी, कविता, डान्स वगैरे करणार...
... किँवा घरातल्या घरात योजना राबवणार, नवरा बायकोला मॅडम बायको नवऱ्‍याला सर म्हणणार,
पोरांना घरातल्या घरातल्या नियम-बियम देणार -
.
मी अश्या कार्यक्रमांना आणि अश्या लोकांकडे जाणं टाळतो.
घुसमट होते.
.
घरात घरासारखंच रहावं.
घरी सुद्धा औपचारिकता ठेवावी लागली तर ते घर कसलं - ते तर डोँबल !
गेट टू गेदरला मस्त गप्पा कराव्या, खावं, मस्ती करावी...
.
अशी एखादी जागा तर ठेवा गड्याहो जिथे हातपाय पसरुन मनासारखं बसता येईल.

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved