प्रिय एबीपी माझा,

प्रिय एबीपी माझा,
व्यवसाय चालवतांना जर चुकूनही आपल्याकडून माती खाल्ली गेली, आणि एंड यूजर दुखावला गेला तर त्याच्यापुढे नाक घासून, प्रसंगी डोकं फोडून माफी मागावी... पण एकुण मामला शक्य तेवढा लवकर थंड करावा... तेच फायद्याचं ठरतं...
.
कारण जर प्रकरण एका लिमिटबाहेर गेलं तर त्याचा परिणाम आपल्या व्यवसायाचा प्राणवायू - म्हणजे पैसा तुटण्यावर होतो. आणि याचा शेवट व्यवसायासाठी खुप वाईट असतो...
.
एबीपी माझा इथेच चुकतंय.
टायटल चुकलं किँवा कार्यक्रम चुकला - मान्य...! बोस्टन हाऊसमध्ये हाडामासाची माणसंच काम करतात. चुक होते !
.
पण ट्विटर, फेसबूक आणि त्यांच्या ऑफीसला येणाऱ्‍या मेल्स, पत्र यांतून महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी (जे एंड यूजर्स आहेत) बिनशर्त माफी मागण्याची मागणी केली... जी प्रेक्षकांच्या दृष्टीने योग्य आहे - ती एबीपीने सातत्याने फाट्यावर मारली, ही घोडचूक ठरतेय... एबीपी माझा जरी स्वतंत्र चॅनेल असलं तरीही कार्यक्रम बघणारे प्रेक्षक आहेत, त्यांच्या संख्येनूसार जाहिराती देणारे जाहिरातदार आहेत... आणि एका चुकीमूळे प्रेक्षकांचा एक पुर्ण वर्ग जर दुरावत असेल तर व्यवसायासाठी ती धोक्याची घंटा आहे.
.
या प्रकरणाचा एबीपीच्या दुर्देवाने दुसरा अध्याय सुरु झालाय. तीन ते चार जाहीराती तुटल्या... एबीपीला जाहिराती असणाऱ्‍यांच्या उत्पादनांवर बहिष्कार घालावा अश्या आशयाचा ट्रेँड ट्विटरवर जोरात सुरुय. जे आता एबीपीच्या हाताबाहेर जातंय... उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची धमकी मिळाल्यानंतर कुठलाही चांगला व्यवसायिक बिथरतो. तो आपल्या ग्राहकांशी पंगा घेवू शकत नाही... आणि तो नेहमी ग्राहकांशीच एकनिष्ठ राहतो. याची दुसरी बाजू देखील एबीपीसाठी त्रासदायक ठरु शकतेय. ती म्हणजे, जो व्यवसायिक एबीपीची जाहीरात तोडेल त्याच्यामागे खंबीरपणे उभं राहण्याची प्रेक्षकांची मानसिकता आहे. त्यामुळे जाहीरातदार याला संधी देखील म्हणू शकतात. चॅनेल शेवटी जाहिरातींवरच चालतं.
.
अजुनही वेळ गेली नाही...
बिनशर्त माफी मागून प्रकरण शांत होणार असेल तर एक पाऊल पुढे येण्यातच शहाणपण आहे... शेवटी एंड यूजरच राजा आहे... डोक्यावर घेणारेही तेच आहेत...
.
प्रिय एबीपी -
तुम्ही महाराष्ट्राची नस ओळखलेलं चॅनेल आहे.
महाराष्ट्राचं मन ओळखण्यात चूक करु नका... प्रेक्षक वि. चॅनेल या द्वंदात फरफट तुमचीच होणार आहे. एक पाऊल पुढे या -
माफी मागितल्याने कुणी लहान होत नाही...
महाराष्ट्र मोठ्या मनाने तुम्हाला माफ करेल...
आणि तुम्ही पुन्हा मराठी मनावर अधिराज्य गाजवाल...!
पण जर यात आडमूठं धोरण धरुन ठेवाल, तर दुर्देवाने आता लहान दिसणारं हे वादळ एका चांगल्या चॅनेलची दाणादाण उडवू शकतं...!
उघडा डोळे... बघा निट...!
.
तेजस कुळकर्णी
(एबीपी माझाचा प्रेक्षक, चाहता, एबीपीच्या निम्म्या टिमचा मित्र...)

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved