लॉरेल अॅन्ड हार्डी - भाग २

आपल्या कॉमेडीने अख्ख्या जगाला गेलं शतकभर खळखळून हसवणाऱ्या लॉरेल अॅन्ड हार्डी या जोडीचा पहिला मूकपट होता द लकी डॉग... जो १९२१ मध्ये रिलीज झाला. एक कुत्रा, ज्यावर लॉरेलचं जीवापाड प्रेम असतं. आणि तो त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींत सांभाळत असतो. पण यामूळे बिचाऱ्या हार्डीची पंचाईत होते. हार्डी कुत्र्यांना प्रचंड घाबरायचा त्यामूळे फार वेगळा अभिनय करायची गरज वाटली नाही. पण लॉरेल इतर वेळी सुद्धा हार्डीवर कुत्र सोडून त्याची फजिती करायचा.
.
अगदी कमी वेळेचा हा मूकपट प्रचंड चालला. आणि प्रेक्षकांनी या जोडीला डोक्यावर घेतलं. पण १९२१ नंतर तब्बल ५ वर्ष ही जोडी अज्ञातवासात गेली. आणि १९२६ मध्ये जाड्या हार्डी आणि रड्या लॉरेल पून्हा अवतरले ते "द ४५ मिनटस् फ्रॉम हॉलीवूड" मध्ये. "द ४५ मिनटस् फ्रॉम हॉलीवूड" हा हेल रिच या दिग्दर्शकाचा चित्रपट. हॉलीवूड चित्रपट बनवायची प्रोसेस लॉरेल अॅन्ड हार्डी करणार... त्यातून निर्माण झालेला प्रचंड गमतीशीर कल्लोळ या चित्रपटात होता. हाच चित्रपट, जिथे लॉरेल अॅन्ड हार्डी खऱ्या अर्थाने सुरु होतात. हेल रिचने नंतर त्यांच्याबरोबर हेल रिच स्टूडीयो स्थापन केला आणि पुढची २० वर्षे लॉरेल अॅन्ड हार्डी प्रेक्षकांच्या मनःपटलाचे राजे झाले...
.
पूटींग पॅन्टस् ऑन फिलीपच्या चित्रिकरणावेळी दुसऱ्या मजल्यावरून लॉरेल बसलेल्या खूर्चीवर हार्डी पडून आला आणि दोघांना पंधरा दिवस घरी लटकावं लागलेलं. यानंतर जेव्हा पून्हा चित्रिकरण सुरु झालं, त्यानंतर दोघांनी आपले रोल अदलाबदल केले. हार्डी मामा आणि लॉरेल भाचा झाला...
स्क्रिनवर होते तसेच, त्यापेक्षाही जास्त खोडकर पण घट्ट मैत्र दोघांचं प्रत्यक्षात होतं. खऱ्या आयुष्यातही ते सोबत काही वर्ष होते.
.
पुढच्या भागात लॉरेल अॅन्ड हार्डीच्या ऑफस्क्रीन आयुष्यावर प्रकाश टाकू...
- तेजस कुळकर्णी
.
#LaurelAndHardy #LaurelAndHardy_TejasKulkarni

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved