Open For Business

#OpenForBusiness
...
Background :
कोरोनाची चाहूल लागताच १३ मार्चलाच आम्ही मुंबई आणि पुणे दोन्ही ऑफीसला वर्क फ्रॉम होमचं नोटीफीकेशन काढलं, दोन दिवसात सगळी सिस्टीम उभारली... आणि १५ नंतर १९ पर्यंतच्या काळात मुंबई-मुंबई उपनगर-ठाणे-पुणे बाहेरच्या असणाऱ्या स्टाफला फॉर सेफसाईड गावाकडे पाठवलं... दरम्यान २२ पासून ट्रेन्स, बस, डोमेस्टिक फ्लाय सगळं बंद झालं... लॉकडाऊन लागलं... आम्ही १३ पासूनच तयारी केल्याने आमची सेफसाईड स्टेप योग्य ठरली... अपेक्षित होतं की फार झालं तर १५ एप्रिल पर्यंत सगळं आवरलं जाणार... आणि महिनाभराचा बॅकलॉग पुढे दिड महिन्यांत सहज भरून येईल... ! पण परिस्थिती हाताबाहेर गेली... मुंबई - पुण्यात कहर झाला... त्यामुळे आता सगळं इतक्यात सुरु होईल असं वाटत नाही...
(Off the record : किमान ३१ जुलै पर्यंत सगळं  सुरळीत होईल असं वाटत नाहीय... त्यानंतरही उभं राहतांना दिवाळी उजाडेल...)
वर्क फ्रॉम होम मूळे प्रॉडक्टीविटी निम्म्यावर येते, पेमेंट टर्मस् ९० दिवस - त्यामूळे हे पेमेंटही जुलैत मिळेल... आणि सध्या प्रत्येक कंपनी कठीण काळातून जात असल्याने आधीच्या इनव्हॉईस क्लियर होत नाहीय...
स्टाफला पगार देणं नैतिकदृष्ट्या बंधनकारक आहे...
RoC, ITR तुर्तास टळलं तरी ऑक्टोंबरला देणं आहेच...
प्रत्येक व्यवसायिक, लहानमोठा उद्योजक सध्या या अभूतपूर्व आर्थिक - व्यवसायिक परिक्षेच्या काळातून जातोय...
आणि कोरोना संपल्यानंतर - जवळपास ६ महिन्यांच्या ब्रेकडाऊन काळानंतर पुन्हा नव्याने उभं रहावं लागणार आहे...
उद्योग म्हणजे एकावर दुसरा अवलंबून असतो... कच्चा माल ते सेल, सर्वीस - प्रॉडक्शन अशी साखळी असते...! एकमेकांवर अवलंबून असल्याने जेव्हा सगळे उभे राहणार तेव्हाच सगळं सुरळीत होईल...!
यात प्रत्येक उद्योगासमोरची आव्हानंही मोठी आहेत,
जसं - स्टाफला आत्मविश्वास देणं, आरोग्य-सुरक्षेची हमी देणं... मुंबई-पुण्याबाहेरच्या लोकांना आता परत येण्याची भिती असेल - ती घालवणं, भांडवल उभं करणं, लिंक्ड् प्रोजेक्ट्स असतील तर ते रिसेट करणं, कच्चा माल ते सेल्सची चेन पुन्हा बसवणं, कंपनीचं बिघडलेलं रुटीन रिसेट करणं, काही ठिकाणी ऑफीस शिफ्ट करणं, स्कीलसेट ब्रशअप करणं, रेकॉर्डस् क्लीअर करणं वगैरे...!
आणि हे केवळ मोठ्या कंपनीच नाही तर स्टार्टअप्ससाठी सुद्धा लागू पडतं...!
दुसऱ्या बाजूला अनेक व्यवसाय - प्रोजेक्टस् बंद पडल्याने, कोसळल्याने बरेच जॉब्ज जाण्याच्या मार्गावर आहेत...!
कोरोनानंतर आर्थिक - औद्योगिक क्षेत्र ढवळून निघणार आहे.
...
Objective - Mission - Vision :
आव्हानं मोठी आहेत, आणि या काळात गरज आहे ती एकमेकांचा हात धरुन उभं राहण्याची - त्याचबरोबर भविष्यातही असा प्रसंग उभा राहीला तर त्यासाठी कायमस्वरुपी पुर्वतयारी, सिस्टिम उभी करण्याची...!
अभूतपूर्व अश्या या काळानंतर व्यवसाय म्हणून उभं राहणं हे एक आव्हान म्हणून स्विकारायचंय, त्याचबरोबर याकडे संकट म्हणून न बघता आपण Professional Opportunity म्हणून बघणार आहोत. टि.के.गृप यासाठी #HoldTheHands प्रोग्राम घेवून येत आहे... ज्याचा उद्देश "एकमेकां सहाय्य करू अवघे धरु सुपंथ" या उक्तीप्रमाणे Group Business साठी समर्थन करणे आहे.
...
डोमेन्स :
आयटी - सॉफ्टवेअर, एचआर, बीपीओ, मिडीया, टेक्सटाईल्स, ट्रान्सपोर्टस् अॅन्ड ट्रॅवल्स, हॉस्पिटॅलीटी आणि सिव्हील इंजिनीअरींग
१. तुमचं स्टार्टअप असेल किंवा व्यवसायाचं लहान यूनिट असेल.
२. तुम्ही जास्तीत जास्त ३० लाख टर्नओव्हर असणारी कंपनी असाल (सिव्हील इंजि.वगळता) (एलपीपी, वन डिरेक्टर, प्रा.ली कंपनी)
३. नव्याने व्यवसाय / स्टार्टअप आयडीयाज् आहेत असे...
४. आपलं भांडवल व्यवसायात लावण्यास उत्सुक असे...
५. टि.के गृपच्या उत्पादनांसाठी (५० टक्के - १०० टक्के ) Franchise घेण्यास उत्सुक असे -
...
हे एक Open Invitation For Business आहे...
ज्यामार्फत टि.के. गृप MoU मार्फत आणि व्यवसायिक भागीदारीमार्फत Group Business साठी समर्थन करत आहे.
यामार्फत टि.के. गृपच्या कुठल्याही प्रोजेक्टमध्ये किंवा कंपनीमध्ये भागीदारी देणे नसून -
ज्या कंपनी किंवा वर उल्लेखित व्यक्ती हे आपला व्यवसाय उभा करु इच्छितात त्यांच्यासाठी टि.के. गृप भागीदारी घेणेसाठी, गृप व्यवसायासाठी किंवा MoU साठी उपलब्ध आहे...
उदा. जर तुमच्याकडे प्रोजेक्ट असेल आणि तो तुमच्या कंपनीला पूर्ण करण्यासाठी रिसोर्सेस अपूर्ण असतील किंवा मोठ्या ब्रेक नंतर पुन्हा उभे राहण्यासाठी अडथळे येत आहेत असं दिसलं तर त्या व्यवसायातील एक भाग टिके गृप मार्फत उचलला जाईल. - टिके गृप त्यामध्ये रिसोर्सेस नुसार प्रमाणबद्ध भागीदारी घेईल... किंवा तुमची स्टार्टअप आयडिया असेल - ती उत्कृष्ठ आहे हे आम्हाला पटलं, आणि सुरुवात करण्यासाठी योग्य प्लॅटफॉर्म मिळत नसेल तर तो पूर्ण प्रोजेक्ट आम्ही भागीदार म्हणून सुरु करू... किंवा तुमच्याकडे भांडवल आहे, सेकंड सोर्स म्हणून किंवा इतर कुठल्याही कारणाने व्यवसाय सुरु करायचा आहे - पण सुरुवात माहित नाही तिथे अश्या स्टार्टअप्सला, गृप्सला एकत्र आणून बुस्टर देऊ... अर्थात हे सगळं कायदेशीर कक्षेत, प्रमाणबद्ध भागीदारीत आणि दोन्ही कंपनीच्या संविधानानुसार होईल...  !
...
या पत्रकाचा दुसरा मुद्दा असा की बऱ्याच कंपनी या आता वेगवेगळ्या डोमेन्समध्ये उत्पादन सुरु करतील. त्यात कदाचित एकच कंपनी पूर्ण भांडवल देऊन उत्पादन न करता किंवा ते Physically  शक्य नसेल तर समव्यवसायिक, भागीदार शोधात असतील...  टिके गृप सुद्धा काही उत्पादनांच्या विचारात आहे... तसेच योग्य प्रस्ताव आल्यास कंपनी स्तरावर त्याबद्दल योग्य चर्चा होईल... !
...
यात आमचा फायदा काय ? -
रिस्क नाही म्हणून उघडपणे सांगतो...!
१. उत्तम स्टार्टअप आयडिया केवळ भांडवल नाही म्हणून वाया न जाता त्या टिके गृपच्या अधिकृत म्हणून सुरु होतील... आणि त्यात समोरची पार्टी प्रमाणबद्ध भागीदार असेल, आणि टिके गृपसाठी ते Expantion ठरेल.
२. जसं या लॉकडाऊन नंतर उभे राहण्यासाठी प्रत्येक कंपनीची आव्हानात्मक धडपड असेल - अर्थात त्यात आम्ही पण आहोत... एकत्र काम केल्याने, काही सुरुवात नव्याने, प्रमाणबद्ध भागीदारीत केल्याने लॉकडाऊनचं रुपांतर संधीत करता येईल... सहज उभे राहता येईल.
३. लॉकडाऊनमुळे जागतिक बाजारपेठेवर प्रचंड परिणाम झालाय... मोठ्या कंपनी याचा फायदा करून घेतीलच - पण आमच्यासारख्या लहान उद्योजकांना जर त्यातून काही लाभ घ्यायचा असेल तर ते एकट्याने घेण्यापेक्षा आपल्यासारख्याच चार कंपनी एकत्र आणूनच घ्यावा लागेल. त्यासाठी हे खुलं आमंत्रण किंवा टिके गृप अश्या संधीसाठी खुलं आहे हे नमूद करणे आहे... !
...
आम्ही या संकल्पनेसाठी आमची सिस्टीम तयार करतोय. साधारण दोन आठवड्यात यासाठीचं प्रत्यक्ष काम सुरु होईल... टिके गृप त्यावर चर्चा आणि कृती यासाठी स्वतंत्र पोर्टल तयार करत आहे... तसेच दोन संचालक आणि तीन सदस्य अशी पाच जणांची टीम याकामी दिलेली आहे... हे काम टिके गृपची principal investment holding company "TK Prosperity" अंतर्गत आहे.  संपूर्ण माहिती, अधिकृत पत्रक, प्रक्रिया, टिके गृपची भूमिका हे त्या पोर्टलवरच दिसेल... तत्पूर्वी जर तुम्हाला यापद्धतीने काम करायची इच्छा असेल किंवा अधिक माहिती हवी असेल तर मला मेसेंजरला मेसेज करून ठेवा किंवा दिलेल्या इमेलवर कळवा... मी पुढील आठवड्यात पोर्टलची लिंक, brochure वैगेरे पाठवेल... कंपनीची वेबसाईट अपडेट करण्याचं काम सुरु आहे.    
....
माझ्या फेसबूक मित्रयादीत महाराष्ट्रातले अनेक उद्योजक, लघु उद्योजक, स्टार्टअप्स आहेत... त्यादृष्टीनेच हे इथे सुद्धा प्रकाशित करतोय...
डीटेल्स चर्चा, MoU Formalities हे सगळं काम केवळ अधिकृत पोर्टलवर आणि व्यवसायिक स्तरावरच होईल...
...
Source of the thought :
युएसए, यूके मधील अनेक उद्योजक भविष्याचा विचार करून, लॉकडाऊनच्या परिणामांचा अभ्यास करुन आपापल्या भौगोलिक  क्षेत्रात हि संकल्पना अमलात आणत आहेत... LinkedIn वर त्यासाठी प्रत्येक प्रोफेशनल, कंपनी #OpenForBusiness किंवा #OpenForGroupBusiness चा बॅज वापरत आहेत... या संकल्पनेचा मूळ स्त्रोत तोच आहे... जे तिथे होऊ शकतं ते इथे भारतात का नाही ? महाराष्ट्रातले उद्योजक एकत्र येवून कां नाही ?
...
तुम्ही #OpenForBusiness साठी इंटरेस्टेड असाल (किंवा नसलाही तरीही) तर या काळात आपल्या कंपनीची (दुकानाची, व्यवसायाची) प्रोफाईल, प्रेझेन्टेशन, वेबसाईट, संविधान वैगेरे तयार करून ठेवा. कंपनी लहान असो वा मोठी -
हा काळ तुमच्या व्यवसायासाठी नाविन्य देणारा ठरू द्या.
...
टिके गृप जबाबदार उद्योग म्हणून या जागतिक आणि ऐतिहासिक संक्रमणाच्या काळात स्वतःबरोबर आणि व्यावसायिकांबरोबर उभे आहोत...
हि वेळ स्पर्धेची नाहीय... तर एकमेकांचा हात हातात धरून उभे राहण्याची - टिकून राहण्याची आहे.
संकटाचं रुपांतर संधीत करण्याची आहे.
...
- तेजस कुळकर्णी
(mail@tejaskulkarni.com)

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved