TK Prosperity Private Limited

२९ मे २०२०...

२०१५ शेवटापर्यंत एका मराठी न्यूज चॅनेलमध्ये टाईमपास करत होतो... दुसरीकडे पुण्यात MCA सुरु होतं...!
मास्टर्स पुर्ण झालं आणि मी माझ्या मूळ ट्रॅकवर आलो... म्हणजे टेक्नॉलॉजी बेस्ड !... छोटे छोटे प्रोजेक्ट घेणं सुरु होतं... कॉलेजमध्ये कॅम्पस होत होते... फ्लो विथ् फ्लो सारखं सगळे देतात तसं इंटरव्ह्यू सेशन्सही सुरु होते...
...
मनात आयुष्यासाठी विशलिस्ट असते - भविष्यात उद्योग उभा करायचाय असं माझ्या विशलिस्ट मध्ये होतं -
फेसबुकवर Quotations मध्ये "चांगल्या पगाराची नोकरी करणारा होण्यापेक्षा, चांगल्या पगाराची नोकरी देणारा होईल" हे वाक्य खुप आधीपासून आहे... 
MCA होतांना ती इच्छा प्रखर होत होती,
आणि त्या इच्छेला त्या दरम्यान हवा मिळाली - 
इच्छा म्हणजे एक गोल सेट झालं...!
हवा मिळण्याची स्टोरी भन्नाट आहे... 
एक मराठी सिनेमा आहे : वन रुम किचन. भरत जाधवचा... त्यात भरत जाधव एका मिलमध्ये काम करतो... चाळीत राहतो... एकदा तो आणि त्याची बायको बायकोच्या मैत्रिणीला भेटायला जातात ... मोठ्ठी सोसायटी, जबरदस्त फ्लॅट... तिथे त्या मैत्रिणीचा नवरा राजेश श्रृंगारपूरे त्यांच्याशी बोलायला येतो - 
सवयीप्रमाणे भरत जाधव विचारतो : "तुम्ही कुठे नोकरी करतात ? 
राजेश श्रृंगारपूरेमध्ये तेव्हा एक स्पेशल Confidence येतो,
नोकरी ?... माझी कंपनी आहे .... स्वतःची ... !
त्याचा तो Confidence, तो Attitude मला हवा देणारा ठरला...
हेच तर हवंय !
...
"द सिक्रेट वर्कस्...."
...
दरम्यान २०१६ च्या सहाव्या-सातव्या महिन्यात एका एमएनसीमध्ये सिलेक्ट झालो होतो... सगळी प्रोसेस झाली... ४ वर्षाचा बॉन्ड, ऑनसाईट जाण्याची संधी, तगडं पॅकेज... ! पण मनात समाधान नव्हतं... काहीतरी चुकतंय असंच वाटत होतं...
मनातच मारामारी सुरु होती.
जॉईनिंगला गेलो - 
जातांना गाडी स्लीप झाली, खरचटलं,
हेवी ट्राफीक लागलं...
दणदण पावसात भिजलो...
कसातरी त्या कंपनीच्या गेटवर पोहचलो तर लेट झाल्यामूळे एंट्री मिळाली नाही -
जॉईनिंग रखडलं
...
खरं सांगायचं तर - 
मनापासून आनंद झाला...!
...
मला घरून कधीच हेच कर म्हणून फोर्स नव्हता, पण माझं मन हिंदोळे घेत होतं... ते शांत झालं...!
ते पॉश ऑफीस, ती सिस्टीम, हजारो हातांना काम देणारं ते कार्पोरेट Environment, Business Empire या सगळ्यानी गारुड केलं -
हे उभं करणाराही कुणीतरी माणूस असेल,
तो करु शकतोय तर आपण कां नाही ?
जे काम दुसऱ्यासाठी करणार ते किंवा त्यापेक्षा जास्त स्वतःसाठी का नाही ?
जर इथे ४ वर्ष अडकलो, "पगार" घेण्याची सवय लागली तर मी माझं स्वप्न कधी पुर्ण करेन ?
आणि त्या दिवशी शब्दशः आयुष्यातली सगळ्यात मोठी रिस्क घेतली... !
रिस्क कारण : करीयर ठरवत होतो, आर्थिक स्थैर्य ठरवत होतो, पुढे लग्न होतं.... 
पण मनाने कौल दिला....
जे होईल ते होईल पण आता पुर्ण लक्ष स्वतःचा उद्योग उभारण्यावरच ! यापुढे जॉबचा विचारही नाही ...!
त्या ऑफीससमोरच्या टपरीवर चहा घेतांना पप्पांना, आणि होणाऱ्या बायकोला फोन केलेला,
माझ्यासाठी घरातनं सपोर्ट हा बाय डिफॉल्ट असतो...!
स्पेशली बायकोचा !
...
मग काम सुरु झालं...!
एकीकडे काम करणं :
प्रोजेक्टस् मिळवणं, टिम तयार करणं, स्टार्टअप प्रोजेक्टस् डिजाईन करणं वगैरे... बाणेरला एका शेअर्ड ऑफीसमध्ये बसून ते पुर्ण करून द्यायचो, त्यातून मिळणाऱ्या पैशातून पुढचं पाऊल उचलायचो...
दुसरीकडे कंपनी उभारणं :
लोगो, नाव, स्ट्रक्चर, बिजनेस मॉडेल वगैरेचं.
पाच-सहा महिन्यांत जवळपास सगळं रुटीन झालं,
आणि काम सुरु केलं Incorporation चं...
लहान कंपनीला तितकं आवश्यक नसतं,
पांढरा हत्ती पोसावा लागतो वगैरे सल्ले मिळाले.
पण पोहण्यासाठी पाण्यात उतरावं लागणार हे माहीत होतं... अंगावर आल्याशिवाय शिंगावर घेण्याची हिंमत येणारच नव्हती...
कारण Incorporation शिवाय बँक, मोठे क्लायंट्स उभंही करत नाही...!
रजिस्ट्रेशन शिवाय काम वाढवता येत नाही...
प्रोसेस सुरु केली.
२९ मे २०१७ ला कंपनीच्या नावापुढे प्रा. ली. लागलं... !
सरकारी मान्यतेचा शिक्का बसला.
Confidence आला.
त्यावरच पुढे बँकेतून लोन घेतलं,
कंपनी वाढती झाली,
Documentation चं वळण लागलं...
MCA च्या निर्देशानूसार कार्पोरेट मॅनेजमेंट, Companies Act प्रमाणे सगळं मेन्टेन करावं लागतंय...
जे खूप मोठं झाल्यानंतर करावं लागणार ते आत्तापासून करण्याची सवय सिस्टीमला लावली.
आणि महत्वाचं म्हणजे
बिजनेस टू जॉब असे परतीचे दोर कापून टाकले.
...
तुलनेने लहान कंपनी, पण एका सिस्टीममध्ये काम सुरु झालं... मुंबईत शिफ्ट केल्यानंतर सुद्धा त्यामूळे कठीण गेलं नाही.
...
आधी TK Consultancy Services या नावाने सुरू होतं
नंतर जसं प्रोजेक्ट्स मिळत गेले आणि पैसा जमत गेला, अनुभव येत गेला आणि गरजांचे हातपाय पसरले तसं IT, BPO डोमेन्स आणि बायकोची शिक्षण क्षेत्रात काम करणारी कंपनी असं एकत्र गृपमध्ये बांधलं... MoA, AoA मध्ये तसे बदल केले आणि सगळ्या व्यवहाराचं केंद्रीकरण केलं TK Prosperity Pvt. Ltd. मध्ये...! सबसिडीअरीज भले वेगवेगळ्या, पण सिस्टीमबरोबर बांधलेल्या...! 
(याचा बेस : मी टाटा गृपचा अभ्यास केला, त्यांची सिस्टीम समजून घेतली - त्यात टाटा सन्स प्रा.ली. ही कंपनी Primary Investment Holding Co. आहे...)
चार कंपनीज् साठी काय गरज ?
तर हा विचार पुढच्या १५ ते २०० वर्षांसाठी आहे... !
टाटा सुद्धा १५० - २०० वर्ष जुनी कंपनी आहे... त्यांची सुरुवातही अशीच असणार... !
आता जरी कंपनी लहान आहे तरीही हिच सिस्टीम माझ्यानंतर पुढे पिढ्यानपिढ्या चालत राहणार... भविष्यात पब्लीक लिस्टेड झाल्यानंतरही कंपनीचं मूळ स्ट्रक्चर बदलायला नको...!
त्यासाठी कंपनीचं Constitution तयार केलंय...!
...
Incorporation ला आज तीन वर्ष झालीत,
काम सुरु होवून चार - साडेचार वर्ष.
आर्थिक अडचणी येतात,
काहीवेळा भलेमोठ्ठे प्रश्न उभे राहतात,
अनपेक्षित धक्के बसतात...
२४ तास तोच विचार असतो,
धावपळ होते -
पण ती माझ्यापूरतीच असणार...
आलंय ना अंगावर - तर घेतलं शिंगावर असा एप्रोज तयार झालाय... प्रसंगी अंगाशी येतं - पण मज्जा येते...!
आपण आपल्यापूरतं एक विश्व उभं करतोय ही जाणीव बळ देते...
...
मी माझ्या बाळाच्या हातात तो मोठा झाल्यानंतर तेव्हा त्याच्या वयापेक्षा चार वर्ष मोठी कंपनी देणार, त्याला शून्यापासून सुरुवात करावी लागणार नाही... हेच खूप मोठं समाधान आहे...
हेच जर मी आणि तेजूने जॉब केला असता तर कदाचित आम्ही या धावपळीपासून, धडपडीपासून दूर असतो -
पण २५ वर्षांनी श्रीयानला पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागली असती...!
...
1000 X 1000 (Three years formula) कार्पोरेट फॉर्म्युलातले Three Years आज पुर्ण झाले.!

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved