#भाकरीबाई
रामतिर्थकर बाईचं स्टेटमेंट बीबीसी मराठीने जरी तोडून मोडून दाखवलं असलं तरीही ती बाई कुठल्या लेव्हलची चंपक आहे हे एव्हाना महाराष्ट्रातल्या घराघरात पोहचलंय... लोकं ऐकतात तर या काहीही पुड्या सोडतात... फुल्ल कॉन्फीडन्सनं...! परवा असं झालं... परवा तसं झालं... परवा सोलापूरला गेले होते - तिथे दारूच्या दुकानाबाहेर बायांची रांग होती, त्यात २१ बाया विशिष्ठ समाजाच्या होत्या - .... काहीही फेकतात...!
...
२०१० मध्ये या बाईचं नव्याने प्रस्थ फुललं होतं... त्यांना ब्राह्मण वधू-वर मेळाव्याला बोलावलं -
बाई आल्या...
"मी तुमची आई" म्हणून एका वाक्यात आई झाल्या...
समोर बसलेल्या मुलींवर सुरु झाल्या...!
करीयर चुलीत घाला, फिरणं बंद करा, हे करा - ते करा...
बाई मोठ्या मोठ्या द्यायच्या - माणसांना मज्जा वाटायची...
एका लेव्हल नंतर तिथे आलेल्या पोरींनी धिंगाणा सुरू केला... कार्यक्रम ठिकाणावर, नसतं प्रकरण उद्भवलं होतं...
झक मारली आणि ही बाई बोलावली असं झालेलं...
...
सासू सून, नवरा बायको यांच्यात भांडणं लावायची,
त्यात सुनेला - बायकोला घरात बसवून पायाशी ठेवायची अक्कल शिकवायची,
आणि एका घरात ठिणगी पाडून दुसरीकडे जायचं...
या बाईची सुनांवर सॉलीड खुन्नस आहे...
...
आपलं ठिक - शहरात राहतो,
शिकलोय -
पण जे खेड्यात राहतात - बुरसटलेल्या विचारांचे आहेत,
अशिक्षित आहेत,
ते या बाईचं भाषण ऐकून भाकरी चंद्रासारखी गोल कां नाही ? विचारत सुनेला फटके देणार नाही कश्यावरून ?
महिन्यातले तीन दिवस थंडीत-उन्हात मुलीला, सुनेला घराबाहेर बसवणार नाहीत ?
थंडीत गार पाणी अंगावर टाकणार नाहीत ?
सकाळी ४ ला उठली नाही तर दे फटके -
फोन वापरला तर दे फटके -
पार्लरला गेली - दे फटके...
नवऱ्याला हुक्की आली - दे फटके...
तथ्य आहे कां ?
...
या करीयरच्या नावे बोंबलतात -
शिक्षणाच्या नावे बडबडतात -
स्वतः भाषणं देत गांवभर हिंडतातच ना ?
यांचं करीयर नाहीय ?
...
लोकं आपलं ऐकतात तर काळानुरुप मर्यादा ठेवून वागलं तर बरं पडतं...
२०२० मध्ये १९५० चे पाठ द्याल तर कसं होणार ?
आणि मुळात प्रत्येक माणसाला त्याची - आपल्या कुटूंबाची काळजी असतेच... मर्यादाही कळतात...
मुलगी बापाच्या गळ्यात पडल्यावर बापाला घाणेरडी फिलींग येत नाही - निसर्गनियम आहे हा... तिचा जन्म त्या बापातून झालेला असतो...!
इंदूरीकर महाराज ट्रोल झाले,
या बाई ट्रोल होताय -
ते एका दृष्टीने बरंच झालंय...
अॅट लिस्ट यापुढे त्यांना काय करायला नको - किंवा प्रवचन-किर्तन याच्या नादात आपण बडबडतोय याचं भान राहील. ...
योग्य ते ऐकतातच - म्हणून आपण या पृथ्वीतलावर एकटेच अक्कल असलेले - समोर बसलेले सगळे बिनडोक हे भ्रमाचं च्युइंगम फुटेल !
...
(नोट : रामतिर्थकर बाईंचं मुलींच्या पुर्नवसनाचं काम निःसंशय खुप मोठं आहे -
पण व्याख्यानात त्यांनी काहीही बडबडलेलं कुणालाही आवडत नाही ...)