सना-त-न
करमत नव्हतं... उदास, एकटं वाटत होतं सकाळपासून ... !
मग मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सनातनच्या परमपूज्य संत अपर्णाताई रामतिर्थकरांच्या अद्भूत भाषणाचे व्हिडीयो यूट्यूबवर लावले आणि समाधी लावून बसलो ... आध्यात्मिक शांतीची अनुभूती घेत असतांना नकारात्मक काळ्या शक्तींनी व्हॉटस्अॅपवर टिंग टिंग वाजवून त्यात भंग आणण्याचा प्रयत्न केला... त्यावर मात करण्यासाठी साधना म्हणून "उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्म घेतलेली दैवी बालके" ह्या क्लिप बघून त्या दैत्यांना साऊथच्या अॅक्शन फिल्मसारखं सपसप मारलं ! ... आता आध्यात्मिक किरणांची अनुभूती होतेय... जर यातूनही उदास वाटणं वगैरे कमी नाही झालं तर आज सुक्ष्मातून सनातन प्रभात वाचेन आणि आध्यात्मिक पातळी दोन-तीन टक्के वाढवून घेईल.. !
...
रविवारी इतकंच ! :-P :-D
..
#सनातन_नव्हे_टनाटन