Roja

(मी हिँदू आहे. आणि पुर्णपणे हिँदूत्वाचा पुरस्कर्ता आहे. खालील स्टेटसचा विपर्यास करुन भलता अर्थ लावू नये आणि विषय भरकटवण्याची समाजसेवा करु नये.)
.
मुस्लिमांचे रोजे या प्रकाराबद्दल मला खूप वर्षाँपासून उत्सुकता आहे. आणि कौतूक सुद्धा. त्यांच्यातले काही लोकं एरव्ही वर्षभर कितीही वाईट वागत असले तरी रमजानचा पूर्ण महीना त्यांच्यातला संयम वाखाणण्याजोगा असतो. पूर्ण दिवसभर पाण्याचा थेँबही न घेता किँवा काहीच न खाता राहणं वाटतं तितकं सोप्पं नक्कीच नाही... एक महीना ते पुर्णपणे त्यांच्या देवाला समर्पित असतात. कुठलेच पापं करत नाही, रमजानच्या काळात कुठलेच शारिरीक संबंध प्रस्थापित करत नाहीत, सेहेर आणि इफ्तारच्या वेळा पाळणं... पाच वेळा नमाज पठण करणं हे किमान महीनाभर काटेकोरपणे पाळतात. आणि म्हणूनच त्यांच्यातली धार्मिक कट्टरता टिकून आहे.
.
तेच आपल्यातले बरेच लोक चार्तुमासात, श्रावणात कांदे-लसूण-मांसाहार वर्ज्य असूनही कंट्रोल राहत नाही म्हणून त्याला थोतांड वगैरे म्हणत खातातच. एकादशी, चतुर्थी, नवरात्रात तर उपवास म्हणून साबुदाण्याचे पदार्थ, राताळे, बटाटे वगैरे पोट दुखेपर्यँत दुपटीनं हाणतात... फक्त दत्तजयंतीला गुरुचरीत्राचं पारायण करतांना सात दिवसांचे कडक नियम पाळणारे अनेकजण आहेत. जैन आणि मारवाड्यांचे बरेच उपवास आणि नियम कडक आहेत आणि ते पाळतात.
.
धार्मिक राजकारण, मुस्लिमांमधील काही सामाजिक, वैचारीक अवगुण हा भाग बाजूला ठेवला आणि मानवी दृष्टीनं विचार केला तर रमजानच्या महिन्यातला त्यांचा सर्वाँगिण संयम हा कौतूकाचा आणि अभ्यासाचा विषय आहे.

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved