Gurupornima 2015

तीन-चार वर्षाँपूर्वी कुठल्याश्या कारणानं भांडणात रागाच्या सर्वोच्च स्ट्रोकला शेजारच्या काकूंना काहीतरी भलतं बोलून बसलो... आणि पुढच्याच क्षणी सगळ्यांसमोर मम्मानं मला एक सणसणीत कानाखाली ओढली... त्यानंतर पुन्हा कितीही राग आला तरी कंट्रोल करायला शिकलोय...!!
.
काही कारणानं एका कस्टमरचा प्रॉडक्ट देण्यासाठी उशीर होत होता... ते इतकं फायद्याचं नाही म्हणून मी चालढकल आणि टाळाटाळ करत होतो... साधारण महिन्यानं त्याचं काम झाल्याचं कळालं... माझ्या आजोबांनी माझ्या नकळत स्वत: लक्ष घालून ते काम पूर्ण करुन दिलं... मला माझी लाज वाटली. आणि आजोबांना सॉरी म्हणून, त्यानंतर कुठलंही काम वेळेतच पूर्ण करण्याची स्वत:ला सवय लावली...!!
.
अंधाराची मला खूप भिती वाटायची... लाईट बंद झाले तरी त त फ फ व्हायचं... एक दिवस पप्पांनी माझी एक महत्वाची वस्तू लपवली... इतर सगळे Options Lock केले... आणि ती वस्तू घेण्यासाठी करो या मरो प्रमाणे अंधाऱ्‍या खोलीत पाठवलं... त्या दिवशी पहिल्यांदाच घाबरत घाबरतच अंधारात उडी घेतली... And yes ! मी करु शकलो... भिती गायब !! पप्पांमूळे आत्मविश्वास आला... नंतर कधीच कुठलीच भिती राहिली नाही...!!
.
दादा - पप्पा - मम्मा माझे गुरु, आयडॉल, सर्वस्व...
गुरुपोर्णिमेच्या शुभेच्छा !!

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved