Ashatai Bhosale

आशाताई आणि लतादीदी या दोन नक्षत्रांनी साठ ते नव्वदच्या दशकातील अनेक गाणी अजरामर केलीयेत... लतादीदीँनी शांत प्रकृतीच्या गाण्यांना साज दिला, तर आशाताईँनी आपल्या सहज वळणाऱ्‍या, गोड आवाजाने शांत प्रकृतीच्या गाण्यांपासून डिस्कोच्या मेलोडीज् पर्यँत गाण्यांमध्ये प्राण ओतला... आशाताईँनी स्वरबद्ध केलेलं प्रत्येक गाणं कालातित झालं... तेव्हापासून आत्तापर्यँत प्रत्येकाच्या ओठांवर रुळलंय. अर्थात त्यांना गाण्यात आणि आयुष्यातही पंचमदांच्या संगीताची तेवढीच भक्कम साथ मिळाली.
.
गाण्यासाठी आशा भोसले नसून आशा भोसलेँसाठी गाणं झालं. चूरा लिया है, आगे भी जाने ना तू, झूमका गिरा रे, आओ हूजूर तुमको, दम मारो दम, दिल ने जिसे अपना कहा सारखी शेकडो हिँदी गाणी... एकाच या जन्मी जणू, मी मज हरपूर, अरे खोप्यामंदी खोपा, उठी श्रीरामा, उष:काल होता होता, किती सांगू मी सांगू कुणाला सारखी अनेक मराठी गाणी आशाताईँच्या स्वरस्पर्शाने एव्हरग्रीन झालीय.
.
पुण्यात एका कार्यक्रमावेळी आशाताई आलेल्या. त्यावेळी धडपडत-गर्दीतून वाट काढत काही क्षणांसाठीच त्यांच्या पायावर डोकं ठेवलं... आणि त्यांच्या हातांचा स्पर्श पाठीवर होताच माझ्या अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आलं होतं... आयुष्य सार्थकी लागलं होतं... तो क्षण माझ्या मनात कोरला गेलाय. आज आठवलं तरी माझे हात जोडले जातात...
.
भक्ती करावी अशी फार थोडी माणसं शिल्लक आहेत... आशाताई त्या थोड्यांपैकी वरच्या रांगेतल्या. या माऊलीनं आपल्याला भरभरुन दिलंय.. त्यांच्यामुळे भारतीय संगीतात प्राण आहे. आणि ही संगीत देवता आयुष्याचं आज सहस्त्रचंद्रदर्शन साजरं करतीय... गळ्यातल्या सूरांना अजूनही मोकळीक आहे - गात्र अजूनही उमेदीतच आहेत... आणि वर्षानूवर्षे ती तशीच रहावी... Happy Birthday आशाताई... अश्याच निरोगी आणि चिरतरुण रहा... आमच्यासाठी !
**touchwood**

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved