Gannapati 2015

तुम्ही काही म्हणा, पण गणपतीच्या दिवसांचा बेस ज्याला म्हणता येईल अशी (पार्वतीच्या बाळा आधीची)
चीक मोत्याची माळ होती तीस तोळ्याची, प्रथम तुला वंदीतो, गणराज रंगी नाचतो, गजानना श्री गणराया... ही चार गाणी ऐकल्याशिवाय गणपती आल्यासारखेच वाटत नाहीत. हि चारही गाणी शांत प्रकृतीची, भक्तीरसप्रधान आणि नितांतसुंदर... अवीट गोडीची... बनानेवालेने सबसे खुबसूरत यही आखिरी चीज बनाई... वगैरे.
.
त्यापैकी चीक मोत्याची माळ माझं ऑल टाईम फेवरेट... चार पाच वर्षाँपूर्वी आम्ही चौघांनी कॉलेजच्या गणेशोत्सव कार्यक्रमात समुहगीत गायलेलं. वन्समोअर आणि अनेक बक्षिसं मिळालेली. त्याचा रियाज करतांना आणि गातांना या गाण्यानं झिँग चढवली होती. आणि बऱ्‍याsssssच बाकीच्या भारी भारी गोष्टीसुद्धा या गाण्यादरम्यान झालेल्या... अगदी आजपण माझ्या कुठल्याही सांगीतिक मैफीलीत प्रथम तुला वंदीतो नंतर हे गाणं नं २ वर असतंच...
.
आत्ता डिजे विद थर्डक्लास धांगडधीँगा... गणेशोत्सवाचं सांगितीक पावित्र्य संपल्यात जमा आहे...
.
बाप्पा... तुझ्या आठवणीच्या कप्प्यातली ती जुनी गाणी आणि जुना गणेशोत्सव तेवढा येतांना आठवणीने घेऊन ये...!
.
bdw आमचा बाप्पा आला घरी. :):)

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved