Mahalakshmi

आज आम्हा देशस्थांकडे महालक्ष्मी असतात, तर कोकणस्थांकडे गौरी. "थोडक्यात गोडी" या उक्तीप्रमाणे कोकणस्थांकडे खड्यांच्या गौरीँची पूजा करतात. नारळाच्या पदार्थांचा नैवेद्य आणि १२ वाजेपर्यँत जेवण... साधेपणात सुंदरता. 
.
आम्हा देशस्थांच्या महालक्ष्म्यांचा थाट मात्र राजेशाही. "लक्ष्मीला शोभावा असाच..." ! उंची साड्या, मुखवटे, दागिने, अत्तरं आणि समोर फळं, मिठाई... आज भलेही जेवायला दुपारचे तीन वाजतील पण, पंचपक्वान्नाचा थाट असतो... पुरणपोळी, सोळा भाज्या, कोशिँबीरी, पुरणाचे दिवे... उद्या विसर्जनाच्या दिवशी खीर-कान्होले. तीन दिवस सजावट, खाण्यापिण्याचा थाट.
.
कोकणस्थ असो वा देशस्थ... गौरी आणि महालक्ष्मी यांच्या पाहुणचारात कुणीच कमी पडत नाही. अतिथी देवो भवः ही उक्ती दोघांकडून पूरेपूर पाळली जाते... आणि गौरी/महालक्ष्मी देशस्थ+कोकणस्थ असा तृप्तीचा माहेरवास भोगून आनंदातच विष्णूलोकात परत जातात...
.
Bdw... येताय ना जेवायला ?? :D देशस्थांचा पाहूणचार करु आज...!

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved