Hindi and Parties

एकीकडे : 
देशातील आरक्षणाच्या पुर्नविचाराची गरज आहे... असं अभ्यासपूर्ण मत परमपूज्य सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी नोँदवले... तसेच इतिहासातील अनेक व्यक्तीँच्या, घटनांच्या पून:अभ्यासाची गरज असल्याचे सांगितले. हिँदूत्वावादी संघटनेचे शिरोमणी भारताच्या वर्तमानाची घडी निट बसवण्यासाठी धडपड करताय.
.
विश्व हिँदू परीषदेचे प्रविणजी तोगडीया हिँदूंचा प्रपंच, रोजगार सुलभ आणि अद्ययावत करुन, हिँदूशक्तीचे एकत्रीकरण करत हिँदूंना शिक्षित, समृद्ध आणि राजकीय-सामाजिक दृष्ट्या सक्षम करताय. हिँदूचे भविष्य संरक्षीत करताय.
.
तर दुसरीकडे सनातनचे प.पू. ज.बा.आठवले...
सदरा कुर्ता घ्या, समष्टी करा, साधना करा, लहरी दिसल्या, वयाआधीच प्रौढ व्हा वगैरे सात्विक बफाऱ्‍या देऊन स्वत:ला कृष्णावतारी म्हणत हिँदूंना बाबा आझमच्या जमान्यात नेताय...
.
संघ आणि विहिँप जीव तोडून जी धडपड करतात ; ती सनातनच्या येड्याचाळ्यांमूळे अर्धी पाण्यात जाते. संघ आणि विहिँपच्या "राजकीय परीपूर्ण सत्ता" या केँद्रबिँदूचा विचार आत्ता काळानुरुप आहे. तिथे हे बिनडोक सनातनवाले हिँदूंच्या तरुण बळाला मुर्खासारखं निळ्या लहरी-काळ्या लहरीँच्या मागे लावतात, सदरा पायजमा घालून घरोघरी पोस्टर्स वाटत फिरवतात आणि संध्याकाळ झाली की पप्पूच्या फोटूला दिवा ओवाळायला सांगतात.
.
या फालतू सनातनच्या नादी लागण्यापेक्षा पांढरा सदरा, हाफ चड्डी, डोक्यावर काळी टोपी घाला, हातात काठी घ्या आणि रविवारी शाखेत या... उभ्या आयुष्याचं कल्याण होईल.

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved