Posts

Showing posts from October, 2015

Year of Fadanavis Gov.

महाराष्ट्र सरकार आज वर्षपूर्ती साजरी करतंय... शिवसेनेच्या येड्याचाळ्यांना, टांगघाल स्वभावाला फूकटाचीही किँमत न देता योग्य रितीने राज्याची धुरा सांभाळणाऱ्‍या फडणवीसांच्या द्रष्टेपणाचं कौतूक वाटतं... . चांगल्या बाजू : (१) फडणवीसांची कार्यपद्धती : चाणक्यनितीचा पूरेपूर वापर करुन फडणवीस कार्य करताय. सर्वसमावेशक धोरण, जनतेचा मुख्यमंत्री आणि अभ्यासपूर्ण आखणी हा फडणवीसांचा पाया आहे. कामाशिवाय वायफळ बडबड नाही हे महत्वाचं. स्वत: लक्ष घालून प्रत्येक काम करताय. (२) विनोद तावडे आणि सुधीर  मुनगंटीवार : शिक्षणमंत्री तावडे आणि वनमंत्री मुनगंटीवार फडणवीसांच्या खांद्याला खांदा लाऊन काम करताय. स्वच्छ चारीत्र्याचे मंत्री आणि कार्यक्षम ! (३) बाबासाहेब पुरंदरे : बाबासाहेब पुरंदरेँच्या महाराष्ट्र भूषणवरुन काही नतद्रष्ट्यांनी रान पेटवलं होतं. पण तावडे-फडणवीस जोडीने न भूतो न भविष्यती असा सोहळा करुन बंटी आणि ब्रिगेड्यांच्या तंगड्या त्यांच्याच गळ्यात घातल्या. (४) जलयुक्त शिवारासाठी फडणवीसांनी महाराष्ट्र पिँजून काढलाय. (५) डिजीटल वर्षाच्या दृष्टीने योग्य कार्य सुरु झाले आहे. (६) वर्षभराचा कारभार पारदर्शक आणि

Dasara 2015

Image
माझं सरस्वती आणि शस्रांचं पूजन... विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा...  . विजयादशमी हि मुख्यत्वे दुर्गेने म्हैशासूरावर मिळवलेल्या विजयानिमित्त साजरी केली जाते. नऊ रात्रींच्या घनघोर लढाईनंतर दहाव्या दिवशी अंबेने म्हैशासूरावर विजय मिळवला... नऊ दिवस युद्धामुळे एकाच जागी अडकलेल्या देवतांनी दहाव्या दिवशी सिमोल्लंघन केलं... नवरात्राच्या आरतीत आहे तसं  दशमीच्या दिवशी अंबा निघे सिमोल्लंघनी हो...  सिँहारुढपरी दारुण शस्त्रे अंबेत्वा घेऊनी हो... शुंभनीशूंभादी राक्षसा किती मारिसी रणी हो... अस्सं... . पांडवांनी याच दिवशी अज्ञातवासातून बाहेर पडून राजवस्त्रे परीधान केली, शमीच्या झाडावर लपवलेल्या शस्रांचं पूजन केलं... आणि तेव्हापासून शस्त्रपूजनाची प्रथा सुरु झाली... . या दोन महत्वाच्या प्रथा... म्हणूनच विजयादशमीला विजयादशमी म्हणतात... आणि शस्त्रपूजन करतात. . रामाने रावणाचा वध केला, पण रावण लंकेश्वर होता... राजा होता... कलाकार होता... रुद्रपूजक होता... त्याने सीताहरणाची चूक केली, पण क्रुरपणे व्याभिचार केला नाही, जबरदस्ती केली नाही... रावणाविषयी मला आदर आहे... . असो. विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा..

Sunday

रवीवारची दुपार... विकऐँड म्हणजे अस्सल शनीवार... त्यातही शनीवारची दुपार... उद्या सुट्टी असल्याची मस्त जाणीव आणि शांतता... त्यातही रवीवारी सकाळची वेळ एकदम भन्नाट... रवीवारची झिँग फार फार तर सकाळी १० पर्यँत टिकते... नंतर दिवस माध्यान्हाकडे कलायला लागला की आपसूकच उद्या पुन्हा मंडे आला यार... ची विचित्र फिलीँग... . डोळ्यावर अलगदशी झोप असते... टिव्हीवर झी टॉकीज छकूला किँवा सेट मॅक्सचा सूर्यवंशम सुरु असतो... मनात रिलॅक्सनेस पण त्यामुळेच नकळत बोजडपणा येतो. आज बरंच काही करायचं ठरवलेलं  असतं... स्पेशली, जेवायला बसतांना डोळ्यावरची अलगद झोड गडद होत असते. रवीवार किती फास्ट सरकतोय यार... इतर दिवस कस्सेही असुदेत, बदलूदेत आपला रवीवार मात्र अनादी काळापासून अभिजात, अस्साच आहे. . सकाळी आठची रंगोली त्यातली सोनाली बेँद्रे इस दिवाने लडके को म्हणत आठवते तसंच दुपारी चार वाजता हमखास सह्याद्रीच आठवणार... ते पण लक्ष्मीकांत बेर्डेच. मग पंधरा एक वर्षांपूर्वीचे संडे फ्लॅशबॅक होणार... रवीवार दुपारच्या चहाला सुद्धा संडे टेस्ट असते... . दिवसाचा उत्तरार्ध सुरु होतो... कंटाळलेला, बोअर, अवजड... उद्या सकाळी "मंडे

Unfortunate Fact

आमचे जवळचे नातेवाईक असलेले एक आजोबा परवा देवाघरी गेले. त्यांची दोन्ही मुलं उच्चशिक्षित आणि वेलसेटल्ड प्रकारातली. लग्न ते पोरांची मुंज वगैरे सगळे कार्यक्रम आटोपलेले... पण पोरांच्या विचित्र स्वभावामूळे त्या आजोबांचा मुक्काम गेल्या दोन वर्षाँपासून वृद्धाश्रमात होता... आणि ३ तारखेला त्यांनी तिथेच आवरलं !! वृद्धाश्रम मॅनेजमेँटनं त्यांच्या मुलांना आणि इमरजन्सी कॉन्टॅक्ट म्हणून आम्हालाही कळवलं.... . अंत्ययात्रा तशी नाहीच... चार पाच फोन केल्यानंतर दोघांपैकी एक मुलगा आला... "मरेपर्यँत  म्हाताऱ्‍याचं तोँडही बघणार नाही" अशी प्रतिज्ञा असल्यानं दुसऱ्‍यानं बहिष्कार घातला...! तासाभरातच सगळं आटोपलं... पण नंतर ऑफीस स्टाफ आणि नातेवाईँकासमोर "पितृऋण" फेडण्यासाठी म्हणून दोघांनी लाख रुपयांचं श्राद्ध घालायचं ठरवलंय... १३-१४ तारखेला श्राद्धसोहळ्यानिमित्त शाही भोजन वगैरे ठेवलंय... ज्याचं श्राद्ध आहे तो माणूस मात्र एकटाच, उपाशीपोटीच तडफडून मेला . आईबापाला जिवंतपणी पाणीही न पाजणारे पितृपक्षात त्यांच्यानावे शंभर लोकांना जेवण घालतात... तो माणूस उपाशी तडफडतच जातो.... मेल्यानंतरचं खाणं वगैरे सग

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved