Sunday

रवीवारची दुपार...
विकऐँड म्हणजे अस्सल शनीवार... त्यातही शनीवारची दुपार... उद्या सुट्टी असल्याची मस्त जाणीव आणि शांतता... त्यातही रवीवारी सकाळची वेळ एकदम भन्नाट... रवीवारची झिँग फार फार तर सकाळी १० पर्यँत टिकते... नंतर दिवस माध्यान्हाकडे कलायला लागला की आपसूकच उद्या पुन्हा मंडे आला यार... ची विचित्र फिलीँग...
.
डोळ्यावर अलगदशी झोप असते... टिव्हीवर झी टॉकीज छकूला किँवा सेट मॅक्सचा सूर्यवंशम सुरु असतो... मनात रिलॅक्सनेस पण त्यामुळेच नकळत बोजडपणा येतो. आज बरंच काही करायचं ठरवलेलं असतं... स्पेशली, जेवायला बसतांना डोळ्यावरची अलगद झोड गडद होत असते. रवीवार किती फास्ट सरकतोय यार... इतर दिवस कस्सेही असुदेत, बदलूदेत आपला रवीवार मात्र अनादी काळापासून अभिजात, अस्साच आहे.
.
सकाळी आठची रंगोली त्यातली सोनाली बेँद्रे इस दिवाने लडके को म्हणत आठवते तसंच दुपारी चार वाजता हमखास सह्याद्रीच आठवणार... ते पण लक्ष्मीकांत बेर्डेच. मग पंधरा एक वर्षांपूर्वीचे संडे फ्लॅशबॅक होणार... रवीवार दुपारच्या चहाला सुद्धा संडे टेस्ट असते...
.
दिवसाचा उत्तरार्ध सुरु होतो... कंटाळलेला, बोअर, अवजड... उद्या सकाळी "मंडे" असल्याची दाट फिलीँग असलेला...

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved