Dasara 2015

माझं सरस्वती आणि शस्रांचं पूजन...
विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा... 
.
विजयादशमी हि मुख्यत्वे दुर्गेने म्हैशासूरावर मिळवलेल्या विजयानिमित्त साजरी केली जाते. नऊ रात्रींच्या घनघोर लढाईनंतर दहाव्या दिवशी अंबेने म्हैशासूरावर विजय मिळवला... नऊ दिवस युद्धामुळे एकाच जागी अडकलेल्या देवतांनी दहाव्या दिवशी सिमोल्लंघन केलं... नवरात्राच्या आरतीत आहे तसं 
दशमीच्या दिवशी अंबा निघे सिमोल्लंघनी हो... 
सिँहारुढपरी दारुण शस्त्रे अंबेत्वा घेऊनी हो...
शुंभनीशूंभादी राक्षसा किती मारिसी रणी हो...
अस्सं...
.
पांडवांनी याच दिवशी अज्ञातवासातून बाहेर पडून राजवस्त्रे परीधान केली, शमीच्या झाडावर लपवलेल्या शस्रांचं पूजन केलं... आणि तेव्हापासून शस्त्रपूजनाची प्रथा सुरु झाली...
.
या दोन महत्वाच्या प्रथा... म्हणूनच विजयादशमीला विजयादशमी म्हणतात... आणि शस्त्रपूजन करतात.
.
रामाने रावणाचा वध केला, पण रावण लंकेश्वर होता... राजा होता... कलाकार होता... रुद्रपूजक होता... त्याने सीताहरणाची चूक केली, पण क्रुरपणे व्याभिचार केला नाही, जबरदस्ती केली नाही... रावणाविषयी मला आदर आहे...
.
असो.
विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा...
दहन करायचंय तर आपल्यातल्या वाईट सवयींचं करा...!

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved