= विश्वाचे दैवी मूळ =

= विश्वाचे दैवी मूळ =
विश्व ही संकल्पना भव्य, उदात्त, अखंड, अमर आणि अनंत आहे. गूढ कधिही न संपणारं रहस्य. आपली पृथ्वी, आकाशगंगा, विश्व, ग्रह, तारे, आकाश, वेळ, देव, काल या प्रचंड गुंतागुंतीचा उलगडा कधीही होत नाही. या आकाशाच्या पुढे काय ? विश्वाचं दार कुठे - अंत कुठे ? त्यापल्याड काय ?... प्रचंड गोंधळ... विचारांची मर्यादा त्यापुढे शून्य आहे... सरतेशेवटी सगळं दैवावर सोडलं जातं. पण दैवाचा जन्म कुठे ? त्याआधी काय ?हे विश्व निर्माणाचा विचार केला तरीही काळाचं चक्र आहेच... येणारा वेळ कुठून येतो ? जाणारा वेळ कुठे जातो... काहीच अनूमान लावू शकत नाही...
.
मला वाटतं या सगळ्या गोष्टींचं ?मूळ आपण स्वतः आहे. प्रत्येकासाठी विश्व, घडामोडी, देव यांचं मूळ, उगमस्थान आपलं मन आहे. आपला भूतकाळ - भविष्यकाळ, शक्ती या आपल्यापासून आहेत. " मन " हेच विश्वाचं मूळ असावं. कारण कुठल्याची गोष्टीची सुरुवात आपल्यापासून होते. शून्यावर आपण असतो. आणि मनातून जन्म झाल्यावरच प्रत्येक गोष्टीचं अस्तित्व आपण मान्य करतो. एक विचार करा... जर मी नसेन तर माझ्यासाठी या विश्वाचं अस्तित्व काय ? आपण मेल्यावर आपलं अस्तित्व, आपलं विश्व तिथेच संपतं. " मी " केंद्रस्थानी ठेवून हा विचार केला तर बरोबर पटेल.
.
एखादी गोष्ट आपण जसा विचार करतो, जशी बिंबवली जाते तशीच भासते, स्पर्श होतो. आणि त्या गोष्टीची प्रतिमा तयार होते. "इच्छाशक्ती" ची संकल्पना यातूनच निर्माण झाली असावी. कुठल्याही गोष्टीचा जन्म आधी आपल्या मनात होतो. तसंच विश्व ही उत्पत्ती आपल्या मनातून असते... हमसेही है सारा जहाँ... तस्संच काहीतरी...
.
विश्व हे एक चक्र आहे... ज्यांची सुरुवात आणि अंत आपल्या मनातंच असते. खूप खूप खोलवर विचार करत गेलात तर शेवटी ही संकल्पना आपल्याच मनाशी येते. आपणंच केंद्रस्थानी असल्याची अनूभूती मिळते... हीच विश्वाची सुरुवात आणि शेवट... दैवाचे स्वरूप आपल्या मनाशी निगडीत आहे... ते कदाचित यामुळेच. थोडक्यात... अनादी मी... अनंत मी... अवध्य मी... सारखंच... सगळे ग्रह तारे नक्षत्र हे आपल्यातच राहतात... बहुदा यामुळेच नक्षत्र - ग्रहतारे यांचा आपल्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होत असतो...
.
विश्वाचं मूळ हे शेवटी मनातंच सापडेल...
गुढ आणि रहस्यमयी...
.
© तेजस कुळकर्णी

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved